नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

Updated:October 18, 2025 16:53 IST2025-10-18T16:47:36+5:302025-10-18T16:53:05+5:30

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

नरक चतुर्दशीला पहाटे उठून अभ्यंग स्नान करण्याची मजा काही वेगळीच असते. पहाटेचा मंद गारवा, उगवतीला आलेला दिवस आणि अंगाला येणारा तेलाचा, उटण्याचा सुगंध म्हणजे आहाहा..

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

आता याच अभ्यंग स्नानाला आणखी जास्त प्रसन्न, आनंददायी आणि आरोग्यदायी करायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही पदार्थ आवर्जून घाला. यामुळे तुम्हाला अजूनच फ्रेश आणि सुगंधी वाटेल.

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गुलाबपाणी घाला. गुलाबाचा मंद सुगंध दिवसभर जाणवेलच. पण त्यामुळे त्वचाही छान होईल.

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

पाण्यामध्ये थोडं मीठ किंवा एप्सम सॉल्ट घालून आंघोळ केल्यास अंगातला थकवा, आळस निघून जातो आणि फ्रेश वाटते.

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

टी ट्री ऑईल, लव्हेंडर ऑईल असे कोणतेही सुगंधी इसेंशियल ऑईल पाण्यात घालून आंघोळ केल्यास ते त्वचेसाठी निश्चितच अधिक लाभदायी ठरतं.

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

सध्या वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला नुकतीच सुरुवात झाली आहे. अशावेळी पाण्यामध्ये जर ग्लिसरीनचे काही थेंब घालून आंघोळ केली तर त्वचा छान हायड्रेटेड आणि मॉईश्चराईज होते.

नरक चतुर्दशी : अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात घाला ५ गोष्टी- एकदम फ्रेश, सुगंधी वाटेल..

आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडा लिंबाचा रस घातल्यास आणखी फ्रेश, उत्साही वाटते. शिवाय टॅनिंगही कमी होते.