Join us

व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे पायांना भेगा पडतात? ४ उपाय- मलम न लावता पाय होतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 18:05 IST

1 / 8
हल्ली पायांच्या सौंदर्याकडे देखील विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे महागड्या पार्लरमध्ये जाऊन पॅडीक्युअरसारख्या गोष्टी देखील केल्या जातात. पायांना भेगा पडल्यावर त्यातून रक्त येणे, चालताना दुखणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Cracked heels vitamin deficiency)
2 / 8
अनेकदा पायांना भेगा पडल्यानंतर आपण दुर्लक्ष करतो. यावर वेळीच उपचार केले नाही तर आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. (Vitamin deficiency foot care)
3 / 8
शरीरात पोषकतत्वांचा कमी अभाव, असंतुलित हार्मोन्स आणि जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे देखील टाचांना भेगा पडतात. यासाठी आहारात कोणते पदार्थ असायला हवे पाहूया. (Home remedies for cracked heels)
4 / 8
आपल्या पायांना प्रत्येक ऋतूमध्ये भेगा पडत असतील तर शरीरात व्हिटामिन ई, व्हिटामिन बी३ आणि व्हिटामिन सीची कमतरता असू शकते.
5 / 8
इतकेच नाही तर शरीरात जीवनसत्त्वे कमी झाल्यास संपूर्ण त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू लागते. त्यामुळे या जीवनसत्त्वांमुळे आपल्या संपूर्ण शरीराला योग्य पोषण मिळते.
6 / 8
आहारतज्त्रांच्या मते व्हिटामिन ई हे शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपैकी एक आहे. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या, किवी, आंबा, कडधान्य, ऑलिव्ह ऑइल हे पदार्थ खा.
7 / 8
व्हिटामिन बी ३ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मासे, चिकन, लाल तांदूळ, काजू, बीन्स आणि केळी इत्यादी पदार्थ खाऊ शकता.
8 / 8
शरीरात व्हिटामिन सी ची कमतरता भरुन काढण्यासाठी आपण लिंबू, संत्री किंवा लिंबूवर्गीय फळे खायला हवी. यामुळे भेगा पडणाऱ्या टाचांपासून आराम मिळेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी