1 / 7चेहरा खूप काळवंडला असेल तर पुढे सांगितलेला एक घरगुती फेसमास्क लावून पाहा. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.2 / 7हा उपाय करण्यासाठी १ चमचा हळद घ्या आणि ती गरम तव्यावर टाकून चॉकलेटी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.3 / 7त्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या. चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचेला फ्रेश लूक देण्यासाठी कॉफी पावडर अतिशय उपयुक्त ठरते.4 / 7आता यामध्ये अर्धा चमचा मध घाला. मध त्वचेला हायड्रेटेड ठेवून उत्तम पोषण देतो.5 / 7यानंतर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा मग १ चमचा बटाट्याचा रस घाला. बटाट्याचा आणि लिंबाचा रस हे दोन्हीही नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात.6 / 7आता सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये दही घाला. आता हा लेप चेहऱ्यावर लावून ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.7 / 7त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.