भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:06 IST
1 / 9जर तुम्ही तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी सुपरफूड शोधत असाल, तर चिया सीड्स हे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. छोट्याशा दिसणाऱ्या सीड्स पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.2 / 9केस गळती थांबवून केस वेगाने वाढण्यास मदत करतात. चिया सीड्स केसांसाठी कशा फायदेशीर आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...3 / 9चिया सीड्स ओमेगा-३ फॅटी एसिडने समृद्ध असतात, जे जळजळ, सूज कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना मुळांपासून मजबूत करतात.4 / 9आपले केस प्रोटीन (केराटिन) पासून बनलेले असतात. चिया सीड्समुळे शरीराला प्लान्ट बेस्ड प्रोटीन मिळतं, जे आपले केस आणखी मजबूत करतात.5 / 9चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. केस आणि टाळूचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. केस गळणे आणि लवकर पांढरे होण्याचा धोका कमी होतो.6 / 9सकाळी उपाशी पोटी चिया सीड्स खाणं चांगलं असतं. उपाशी पोटी पोषक तत्व अधिक लवकर शोषून घेतात. यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळतं, केस निरोगी राहतात.7 / 9रात्रभर पाण्यात १ चमचा चिया सीड्स टाका. सकाळी ते जेलसारखे होईल. त्यात अर्धा लिंबू पिळा आणि प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.8 / 9चिया सीड्समुळे तुमच्या केसांना आवश्यक मिनरल्स आणि हायड्रेशन मिळतं. चांगल्या केसांसाठी फक्त चिया सीड्सवरच अवलंबून राहणं पुरेसं नाही. 9 / 9हेल्दी लाईफस्टाईल, बॅलेन्स डाएट आणि दररोज केसांची योग्य काळजी घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. केस गळतीच्या समस्येने हल्ली सर्वजण हैराण झाले आहेत.