1 / 6आपल्या मेकअप किटमध्ये अनेक लिपस्टिक शेड्स असतात. ज्याचा वापर आपण करुन आपण छान दिसण्याचा प्रयत्न करतो. काही लिपस्टिक शेड्स अशा असतात ज्या आपल्या स्किन टोनला सूट होत नाही.(Lipstick for dusky skin)2 / 6अनेकांना असं वाटतं गोऱ्या रंगाच्या मुलांनी सगळ्या रंगाच्या लिपस्टिक शेड्स सुट होतात. पण काळी, सावळी, गव्हाळ. प्रत्येक त्वचेचा स्वतःचा एक वेगळा ग्लो, डेप्थ आणि अंडरटोन असतो. योग्य शेड निवडला, तर ओठ फक्त सुंदर दिसत नाहीत, तर संपूर्ण लूकच उठून दिसतो. पाहूयात सावळ्या रंगाच्या मुलींसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्सचे पर्याय. (Best lipstick shades for dark skin)3 / 6बरगंडी आणि वाईन रेड सारखे गडद रंग गडद रंगाच्या आपल्या चेहऱ्यावर एक शाही आणि ठळक रंग देतात. हे रंग संध्याकाळच्या समारंभात चेहऱ्यावर एक वेगळी चमक देतात.4 / 6लग्न समारंभात गडद लाल, ब्रिक रेड आणि टेराकोटा सारखे रंगछटांचे शेड्स अधिक छान आहेत. क्लासिक चमकदार लाल रंगांपेक्षा वेगळे रंग सावळ्या रंगाच्या टोनवर सुंदर दिसतात. 5 / 6प्लम, क्रॅनबेरी आणि डीप बेरी सारखे शेड्स सावळ्या रंगावर अधिक खुलून दिसतात.हे शेड्स रिसेप्शन, कॉकटेल पार्टी किंवा संगीत समारंभांसाठी एक ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक देतात.6 / 6मेहंदी आणि हळदीसारख्या समारंभात न्यूड शेड्स उठून दिसतात. चॉकलेट ब्राउन, कॅरॅमल आणि टॉफी ब्राउन सारखे शेड्स ओठांना चांगला लूक देतील.