1 / 9लिपस्टिक ही अनेक महिलांची अशी एक सौंदर्यसामग्री आहे जी चेहऱ्याला क्षणात फ्रेश आणि आकर्षक लूक देते. पण अनेकदा आपण अशा काही लिपस्टिक शेड्स घेतो ज्या आपल्या स्किन टोनला सूट होत नाही. त्यामुळे मेकअप करुनही चेहरा फिकट किंवा जास्त डार्क दिसू लागतो. (Lipstick shades for all skin tones)2 / 9पण काही लिपस्टिक शेड्स अशा आहेत ज्या कोणत्याही स्किन टोनवर सहज सूट होतात. फेअर, व्हाइटीश , ब्राउन किंवा डस्की स्किन टोनवर सूट होणाऱ्या ५ लिपस्टिक शेड्स पाहूया. (Best lipstick shades)3 / 9न्यूड पिंक हा सगळ्यात चांगला आणि क्लासिक लिपस्टिक शेड मानला जातो. ऑफिस, कॉलेज किंवा डेली वेअरमध्ये हा रंग फारच सुंदर दिसतो. 4 / 9रोझ पिंक हा रंग गुलाबी आणि ब्राउन मिक्स शेड्समध्ये असल्यामुळे सगळ्या रंगांच्या स्किन टोनवर सूट होतो. फेअर स्किनवर फ्रेश तर डस्की स्किनवर एलिगंट दिसतो. 5 / 9माउव्ह हा पर्पल आणि पिंकचा परफेक्ट बॅलन्स असलेला लिपस्टिक शेड आहे. पार्टी किंवा नाईट फंक्शनमध्ये आपण ही लिपस्टिक शेड ट्राय करु शकतो. 6 / 9पीच न्यूड लिपस्टिक शेड आपल्या त्वचेला नैसर्गिक रंग देते. इंडियन स्किन टोनवर हा रंग अधिक क्लासी लूक देतो. 7 / 9ब्रिक रेड लिपस्टिक हा शेड्स सगळ्या स्किन टोनसाठी परफेक्ट लूक देणारा आहे. हा रेड आणि ब्राउनचा मिक्स शेड असल्यामुळे सगळ्या स्कीन टोनवर सूट होतो. 8 / 9थोडा डार्क पण क्लासी लूक देणारा बेरी शेड. फेअर स्किनवर रिच तर डस्की स्किनवर ग्लॅमरस लूक देतो. 9 / 9सॉफ्ट ब्राउन रंगाचा लिपस्टिक शेड हा रोजच्या वापरण्यासाठी चांगला पर्याय आहे. आपल्या स्किन टोनला मॅच होत असल्यामुळे नैसर्गिक रंग देतो.