चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येत असतील तर सगळ्यात आधी 'हे' काम करा, काही दिवसांतच पिंपल्स गायब...
Updated:October 4, 2024 13:25 IST2024-10-04T13:19:21+5:302024-10-04T13:25:26+5:30

बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की चेहऱ्यावर एकदा पिंपल्स यायला सुरुवात झाली की ते सातत्याने येत राहतात..(how to get rid of pimples?)
एक गेला की दुसरा पिंपल चेहऱ्यावर हमखास यायला सुरुवात झालेलीच असते. असं होण्यामागचं कारण नेमकं काय आहे ते पाहा
एका ठिकाणचं दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन पिंपल्स येतात ही गोष्ट तर खरी आहेच. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात तयार झालेले विषारी घटक..
त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने पिंपल्स येत असतील तर शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आता आलेली आहे, हे ओळखून घ्या.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. जेणेकरून शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होईल.
त्याचबरोबर पोटाच्यावर अजिबात खाऊ नका. तेलकट, तुपकट पदार्थ, जंकफूड, प्रोसेस फूड, साखरेचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा आणि पोटाला आराम द्या.
याशिवाय जेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असतील तेव्हा दही- दूध यांपासून तयार केलेले कोणतेही लेप चेहऱ्याला लावू नये, अशी माहिती तज्ज्ञांनी merishrushti या इंस्टाग्राम पेजवर केली आहे.
हे दोन्ही उपाय केले असता चेहऱ्यावरचे पिंपल्स काही दिवसांतच बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतील.