1 / 10केसांची काळजी घेताना सर्वात फक्त शाम्पू, तेल आणि कंडिशनरवर लक्ष केंद्रित केलं जातं. परंतु केसांसाठी कंगवा देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. 2 / 10काहींचे केस कुरळे असतात, काहींचे केस सरळ असतात. विविध प्रकारच्या केसांसाठी एक विशेष कंगवा वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून केस खराब होऊ नयेत. तसेच स्टायलिंग सोपं होतं. केसांसाठी कोणत्या प्रकारचा कंगवा सर्वोत्तम आहे ते जाणून घेऊया...3 / 10जर तुमचे केस कुरळे असतील तर एक्स्ट्रा-वाइड दात असलेला कंगवा सर्वोत्तम आहे. यामुळे केस तुटत नाहीत, हे केस सहजपणे विंचरण्यास मदत करतं.4 / 10सरळ, पातळ केसांसाठी बारीक दात असलेला कंगवा सर्वोत्तम आहे. यामुळे केस विंचरणे आणि स्टाईलिंग करणं खूप सोपं होतं.5 / 10ओले केस सर्वात कमकुवत असतात आणि तुटण्याची शक्यता जास्त असते. अशा केसांसाठी डिटँगलिंग कंगवा वापरा जो जोर न लावता केस विंचरतो आणि तुटण्यापासून रोखतो.6 / 10लाकडी कंगवा सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. यामुळे स्काल्पची मालिश होते, केस चमकदार आणि सुंदर दिसतात.7 / 10जर तुम्हाला केसांचं स्टायलिंग करायचं असेल तर टेल कंगवा हा सर्वोत्तम आहे. पार्टिंगसाठी त्याचा फायदा होतो. 8 / 10जसं चेहऱ्याच्या काळजीसाठी योग्य क्रीम आणि क्लींजर आवश्यक आहे, तसेच केसांसाठी योग्य कंगवा निवडणं देखील खूप महत्त्वाचं आहे. 9 / 10जर तुम्ही तुमच्या केसांच्या रचनेनुसार योग्य कंगवा निवडला तर केस गळणे, गुंतणे आणि तुटणे हे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. 10 / 10जेव्हा तुम्ही कंगवा खरेदी करायला जाल तेव्हा तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा योग्य आहे याचा नक्की विचार करा आणि त्यानुसार कंगवा विकत घ्या.