1 / 6चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी बीटरुरचा रस खूप उपयुक्त ठरू शकतो...2 / 6बीटरुट जसे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, तसेच ते आपल्या त्वचेसाठीही खूप गुणकारी ठरते. चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी करून त्वचेवर इंस्टंट ग्लो येण्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीने एकदा बीटरुट वापरून पाहा. 3 / 6हा उपाय करण्यासाठी बीटरुटचे काप मिक्सरमधून फिरवून त्याचा रस काढून घ्या. आता १ चमचा बीटरुटच्या रसामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला. 4 / 6आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळून मालिश करा. हा लेप तुमच्या त्वचेसाठी स्क्रबरप्रमाणे काम करेल. यामुळे डेडस्किन, टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.5 / 6व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो.6 / 6यानंतर बीटरुटच्या रसामध्ये थोडे गव्हाचे पीठ आणि थोडे बेसन घालून कालवा. हा फेसमास्क चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल.