Join us

उन्हाळ्यात त्वचा तेलकट - डल होते? ५ होममेड फेस पॅक- डीटॅनपासून होईल सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2025 16:12 IST

1 / 7
उन्हाळ्यात आपली त्वचा सारखी तेलकट होते. यामुळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होतात. ज्यामुळे त्वचेवर घाण आणि जंतू जमा होऊ लागतात. (Summer beauty tips for oily skin)
2 / 7
त्वचा तेलकट होऊ लागली की, मुरुमांची समस्या देखील वाढते. ही समस्या टाळण्यासाठी आपण त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तेलकट त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी होममेड फेस पॅक ट्राय करा. (Homemade face pack for oily skin)
3 / 7
तेलकट त्वचेसाठी दोन चमचे बेसनात गुलाबपाणी घाला, त्यात आपण लिंबाचा रस देखील घालू शकतो. १५ मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
4 / 7
चमचाभर मुलतानी मातीमध्ये चंदनाचा पावडर मिसळा त्यात गुलाबजल किंवा थंड पाणी मिसळा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल.
5 / 7
टोमॅटोच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावा. यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
6 / 7
एक चमचा कोरफडीच्या गरात समप्रमाणात मध मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. कोरफड त्वचेला थंड करते. ज्यामुळे आपली त्वचा तेलकट होत नाही.
7 / 7
दोन चमचे दह्यात एक चमचा ओट्स मिसळा. ओट्सची पावडर असायला हवी. हे चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी