1 / 7आपल्या प्रत्येकाच्या त्वचेचवर मुरुमे-पिंपल्स येतात ही समस्या सामान्य वाटत असली तरी काही काळाने चेहरा आपला खराब दिसू लागतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने बॅक्टेरिया वाढतात. 2 / 7त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने आणि हार्मोनल बदलांमुळे मुरुमांची समस्या वाढते. तसेच आपला आहार कसा असतो याचा परिणाम देखील आपल्या चेहऱ्यावर होतो. 3 / 7दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स खाल्याने आपल्या त्वचेवर मुरुमे येतात. दुधात अमीनो आम्लाचे घटक असतात जे त्वचेवर मुरुमे येण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण कमी असायला हवे. 4 / 7साखर आणि कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ मुरुमांच्या समस्या वाढण्यास कारणीभूत असतात. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे मुरुमे येऊ लागतात. 5 / 7चिप्स, नुडल्ससारख्या पदार्थांमुळे मुरुमांची समस्या वाढते. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात हार्मोनल असंतुलित होते. ज्यामुळे चेहरा खराब होऊन पिंपल्स येतात. 6 / 7सतत गोडाचे पदार्थ, चॉकलेट्स खाल्ल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्वचेतील कोलेजन कमी होऊन मुरुमांची समस्या उद्भवते. 7 / 7चेहऱ्यावरील मुरुमे-पिंपल्स कमी करण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायला हवे. तसेच आहारात पौष्टिक पदार्थ, कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.