साडी सिल्क असो की शिफॉन, ब्लाऊजची स्टाइल परफेक्ट हवी! १० ब्लाऊज डिझाइन्स- पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:35 IST
1 / 13आता काही दिवसातच लग्नसराई सुरू होईल. कार्यक्रम, सण कोणताही असो महिलांना साड्या नेसण्याची हौस फारच असते. साड्यांवर त्याच त्याच टाईपचे टिपिकल ब्लाऊज शिवण्यापेक्षा लेटेस्ट पॅटर्न्स ट्राय केले तर लूक अधिकच खुलून येईल. 2 / 13ब्लाऊजवर टॅसल डिजाईन्ससुद्धा सुंदर दिसतात. साडीवर मॅचिंग असेल टॅसल्स ब्लाऊजला लावून घ्या. यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचा समावेश करू शकता.3 / 13हे ब्लाउज डिझाईन शिफॉन साडीसोबत छान दिसतात. विवाहसोहळ्यांव्यतिरिक्त, तुम्ही या प्रकारचे ब्लाउज डे आउटिंग आणि किटी पार्ट्यांमध्ये देखील घालू शकता. जर तुमचा बॅक टोन्ड असेल तर हे ब्लाऊज तुम्हाला आणखी छान दिसतील.4 / 13ब्लाउजचा मागचा भाग साधा ठेवा आणि मध्यभागी जुळणारे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचे बटण निवडा. जे स्टाइल आणि कम्फर्ट या दोन्ही बाबतीत उत्तम असेल.. 5 / 13बॅकला नॉड्सची डिजाईनसुद्धा उठून दिसेल. मल्टी स्ट्रीप्स जाळीदार ब्लाऊज डिसेंट लूक देईल. याशिवाय यात फिगरही उत्तम दिसेल.6 / 13जाळीदार पाठ असलेले ब्लाऊज तुम्हाला उत्तम लूक देतील यात तुम्ही चोकौनी, गोल नेटच्या गळ्याची स्टाईल करू शकता.7 / 13कॉटनच्या साडीवर किंवा ओगेंजा साडीचं ब्लाऊज तुम्ही या पद्धतीचं शिवू शकता.8 / 13फिगर मेटेंन असल्यास तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज शिवू शकता. यामुळे हॉट, डिसेंट ड्रेसअप वाटेल.9 / 13मागे त्रिकोणी गळा आणि बटणांची डिजाईन हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. तुम्ही आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाच्या बटणांची निवड करू शकता. 10 / 13 हे नवीन स्लिव्हज ब्लाऊज पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. 11 / 13ब्लाऊजच्या पागे पतंगाप्रमाणे पॅटर्न्स शिवून बटन्स लावल्यानं तुमचा लूक अधिक खुलेल.12 / 13थ्री फोर हॅण्ड्सचं डिपनेक ब्लाऊज नेहमीच ट्रेंडीग असतं. 13 / 13लग्नसमारंभात तुम्ही या टाईपचं हेवी डिजाईन्सचं ब्लाऊज शिवू शकता.