Join us

वॅक्सिंग नको! बिटाच्या रसाचा 'असा' करा उपयोग, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो-वॅक्सिंगची वेदनाही नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 17:05 IST

1 / 7
शरीरावरील नको असणारे केस काढून टाकण्यासाठी आपण महागड्या पार्लरमध्ये जातो खरे पण आपल्याला प्रचंड वेदनांना देखील सामोरे जावे लागते. या केसांमुळे आपल्याला अनेकदा हवे तसे कपडेही घालता येत नाही. तसेच लाज देखील वाटू लागते.
2 / 7
अनेकदा वॅक्सिंग करताना आपण रेझरचा वापर करतो ज्यामुळे त्वचा काळी पडते. जर आपल्यालाही त्वचेवरील केस काढायचे असतील तर काही घरगुती उपाय करायला हवे.
3 / 7
बिटाचा रस हा फक्त शरीराला पुरेशा प्रमाणात पोषणच देत नाही तर आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतो. यामुळे शरीरातील रक्त वाढते. तसेच त्वचेवर ग्लो देखील येतो.
4 / 7
बिटामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या गुलाबी रंग मिळतो ज्यामुळे त्वचा अधिक आकर्षित बनते. अनेकदा केमिकल असणाऱ्या वॅक्समुळे त्वचा अधिक काळी पडते. अशावेळी आपण बिटाच्या रसाचा वॅक्स वापरु पाहायला हवा.
5 / 7
बिटाचा वॅक्स तयार करण्यासाठी ग्लासभर ज्यूस, साखर आणि लिंबाचा रस उकळवून त्याचे दाटसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण आपल्या हाताला-पायाला लावून वॅक्स करा. यामुळे केस निघण्यास मदत होतील.
6 / 7
अपर लिप्स करताना अनेकदा त्वचेवर रॅशेस येतात, लालसर डाग पडतात अशावेळी बिटाचा वॅक्स चांगला ठरतो. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.
7 / 7
बीट हे अनेक रासायनिक उत्पादनांपेक्षा सुरक्षित आहे. यामुळे त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापर करु शकतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी