1 / 8कामाचा वाढलेला ताण, ऊन, प्रदुषण, अपुरा आहार यामुळे हल्ली स्किन केअर समस्याही कमी वयातच डोकं वर काढायला लागल्या आहेत..2 / 8त्यामुळेच तर हल्ली तिशी ओलांडलेल्या कित्येक जणींच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स दिसायला लागतात. 3 / 8चेहऱ्यावर दिसणारं हे सुरकुत्यांचं जाळं कमी वयातच वाढू द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेचच करायला सुरुवात करा.4 / 8हा उपाय करण्यासाठी १ कप पाणी घ्या. त्यामध्ये १ इंच ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक ठेचून घाला. 5 / 8आता त्याच पाण्यात १ चमचा जवस घाला. जवस आणि ज्येष्ठमध हे दोन्ही पदार्थ तुमच्या त्वचेला तारुण्य देतील...6 / 8पाणी ४ ते ५ मिनिटे चांगलं उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन घाला. ग्लिसरीनमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.7 / 8आता यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा बदाम तेल घाला. बदाम तेलही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.8 / 8रोज रात्री झोपण्यापुर्वी हे सिरम चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मालिश करा. बघा काही दिवस हा उपाय केल्यास अकाली आलेल्या सुरकुत्या गायब होतील आणि तुम्ही १० वर्षांनी तरुण दिसू लागाल.