1 / 8महाराष्ट्रात असे फार कमी लोक असतील ज्यांना भात खायला आवडत नाही. भात हे आपले मुख्य अन्न आहे असे म्हणायला हरकत नाही. सगळीकडेच भात आवडीने खाल्ला जातो. भात पौष्टिक आहे की नाही हा विषय जरी कायम वादात असता तरी तांदळाचे पाणी पौष्टिकच असते यात काही वाद नाही.2 / 8केसांसाठी तांदळाचे पाणी अगदी औषधी असते. अनेक विविध प्रकारे हे पाणी केसांसाठी तुम्हीही वापर असालच. या पाण्याचे अनेक प्रॉडक्ट्स आता बाजारात आरामात मिळतात. शाम्पू ते कंडीशनर सगळ्या गोष्टी मिळतात. 3 / 8तांदळाचे पाणी फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही फार चांगले असते. त्यामुळे राईस वॉटर फेसवॉश वगैरे आजकाल मिळतात. मात्र ते आणून प्रयोग करण्यापेक्षा अगदी सोपा उपाय घरीच करुन पाहा. नक्की उपयुक्त ठरेल. 4 / 8तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेटेड करते. तसेच त्वचा मऊ होतो. पिंपल्स येत नाहीत आणि रंग उजळतो. सुरकुत्या जातात आणि त्वचा अगदी छान तरोताजी होते. इतरही फायदे मिळतात. 5 / 8चेहऱ्याला तांदळाचे पाणी लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी ही एक पद्धत अगदी सोपी आहे फायदाही होतो. नक्की करुन पाहा. 6 / 8तांदूळ पाण्यात भिजवायचे धुवायचे आणि मग तांदळाचे पाणी काढून घ्यायचे. ते पाणी आईस ट्रेमध्ये भरायचे. ते फ्रिजरला ठेवायचे आणि गोठवायचे. 7 / 8झोपण्यापूर्वी उठल्यानंतर चेहऱ्यावरुन त्या राईस वॉटर आईस क्यूब्स फिरवायच्या. चेहर्यासाठी बर्फ फार चांगला असतो. एकाच उपायात दोन गोष्टी करता येतात. 8 / 8काही दिवसांनंतर पुन्हा दुसर्या क्यूबज करायला लावायच्या. जास्त दिवसांसाठी ठेवायच्या नाहीत. आठवडाभरासाठीच ठेवा. नाही तर त्यांचा काही फायदा होत नाही.