Join us

रात्री तुरटीमध्ये मिसळून लावा 'हे' २ पदार्थ, सकाळी उठताच त्वचेवर येईल ग्लो-पिंपल्सही जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 19:05 IST

1 / 7
तुरटी ही आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्वचेवर लावली जाते. ती लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात.
2 / 7
त्वचेवर डाग, सुरकुत्या, पिंपल्स-मुरुमांचा त्रास होत असेल तर तुरटी चेहऱ्यावर कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळी लावायला हवी, जाणून घेऊया.
3 / 7
गुलाब पाण्यात चमचाभर तुरटी पावडर आणि थोडे ग्लिसरीन मिसळा. हे रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवा. सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
4 / 7
रात्रभर चेहऱ्यावर तुरटी लावल्याने आपल्या त्वचेवरील मुरुमे कमी होऊ शकतात. तसेच बॅक्टेरिया नष्ट होतील आणि त्वचा निरोगी होईल.
5 / 7
जर आपली त्वचा तेलकट असेल. त्वचेवर मुरुमे आणि इतर समस्या वारंवार होत असतील तर या समस्यांपासून आराम मिळेल.
6 / 7
रात्रभर त्वचेवर तुरटी लावल्याने त्वचेवरील टॅनिंग कमी होते. तुरटी लावल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.
7 / 7
चेहऱ्यावर तुरटी लावल्याने काळे डाग, ठिपके आणि मुरुमे कमी होतात. तसेच त्वचा उजळण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी