Join us

वॅक्सिंग केल्यावर त्वचेला खाज येणार नाही, पुरळ उठणार नाही, फक्त लक्षात ठेवा हे सोपे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2025 17:10 IST

1 / 7
वॅक्सिंग करणे आजकाल अगदीच सामान्य गोष्ट आहे. रेझर फिरवण्यापेक्षा वॅक्सिंग जास्त चांगले असेही अनेक जणी सांगतात. मात्र वॅक्सिंग करताना त्वचा ताणली जाते. त्वचेला त्रास होऊ नये यासाठी वॅक्सिंग करण्याआधी काही नियम लक्षात ठेवा.
2 / 7
वॅक्सिंग करण्याआधी दोन दिवस स्क्रब करा. त्यामुळे त्वचेवरील घाण कमी होते. तसेच मृतपेशी कमी होतात. त्यामुळे वॅक्सिंग करताना त्रास होत नाही. तसेच केसही जरा मऊ होतात आणि जास्त ओढले जात नाहीत.
3 / 7
वॅक्सिंग करताना त्वचेवर तेल, पाणी, घाम काहीच नसेल याची काळजी घ्या. त्वचा स्वच्छ आणि कोरडीच असेल याची काळजी घ्या. कोणतंही लोशन लावायचे नाही.
4 / 7
वॅक्सिंगसाठी अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळतात. त्यातून तुमच्या त्वचेला सुट होणारा प्रकार निवडा. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यानुसारच प्रॉडक्ट्स वापरा. योग्य पद्धत शिकून घ्या, मगच घरी प्रयोग करा.
5 / 7
वॅक्सिंग करुन झाल्यावर लांब हातांचे घट्ट कपडे अजिबात वापरु नका. गरम कपडे वापरणे टाळा. मऊ कॉटनचेच कपडे वापरा. हातापायाच्या त्वचेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
6 / 7
वॅक्सिंग करुन झाल्यावर शरीराला मस्त भरपूर कोरफडीचा अर्क चोळा. कोरफडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो. त्यामुळे त्वचा सुंदर राहते आणि वॅक्सिंगचा त्रास होत नाही.
7 / 7
वॅक्सिंग करुन झाल्यावर सारखा त्वचेला हात लावणे टाळा. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. काही तास पायाला आणि दंडाला हात लावणे टाळा. म्हणजे खाज सुटत नाही.
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्समहिलाहोम रेमेडी