1 / 5बऱ्याच जणींचा असा अनुभव आहे की मेकअप केल्यानंतर त्यांचा चेहरा भुरकट हाेतो किंवा अगदीच काळवंडल्यासारखा दिसतो. म्हणूनच आता मेकअप असा का होतो याची कारणं जाणून घेऊया.2 / 5तसेच परफेक्ट मेकअप व्हावा, यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील पाहूया. ही सर्व माहिती mamta._.artistry या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 3 / 5सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेकअपसाठी तुमच्या त्वचेचं व्यवस्थित स्किन प्रिपरेशन झालं नसेल तर चेहऱ्यावर मेकअप व्यवस्थित बसत नाही. स्किन प्रिपरेशन म्हणजे क्लिंझिंग, टोनिंग, मॉईश्चरायझिंग या सर्व स्टेप तुमच्या स्किनटाईपनुसार व्हायला पाहिजेत. शिवाय अशा पद्धतीची त्वचेची काळजी रोजच घेतली पाहिजे.4 / 5जर मेकअप केल्यानंतर चेहरा काळा पडल्यासारखा किंवा ग्रे झाल्यासारखा वाटत असेल तर तुम्ही मेकअपसाठी निवडलेलं कलर करेक्शन चुकलेलं आहे. बरोबर त्वचेशी मिळतं जुळतं कलर करेक्शन निवडलं तर चेहरा काळवंडणार नाही. 5 / 5तुमच्या स्किनटोनच्या दोन- तीन शेड लाईट असणारं फाउंडशेन, कन्सिलर, कॉम्पॅक्ट निवडलं तरी मेकअप चांगला होण्यास मदत होईल.