1 / 9त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमीच महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची किंवा मेकअप करण्याची गरज नसते. रोजच्या रोज काही साध्या सोप्या गोष्टी केल्या तरी चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहू शकताे.2 / 9या काही स्किन केअर टिप्स अशा आहेत ज्या सगळ्यांना अगदी सहज जमू शकतील. त्यासाठी काहीही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही.3 / 9सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचा चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो.4 / 9तुमच्या रोजच्या जेवणात भाज्या आणि सलाड यांचे प्रमाण चांगले असायला हवे. हंगामी फळं भरपूर प्रमाणात खाण्यावर भर द्या. फळांमधून मिळणारे ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. 5 / 9त्वचेवरचे टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचा चमकदार करण्यासाठी मुलतानी माती, बेसन, मसूर डाळीचे पीठ, कोरफडीचा गर, कॉफी पावडर, मध, दही, लिंबू अशा घरगुती पदार्थांचा वापर करा. 6 / 9दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा स्वच्छ धुवा आणि त्याला व्यवस्थित मॉईश्चराईज करा.7 / 9रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला थोडेसे साजूक तूप, गुलाब जल, ग्लिसरिन यापैकी काहीतरी लावून मालिश करा. 8 / 9उन्हात जाण्याआधी चेहऱ्याला आठवणीने सनस्क्रिन लावा आणि संपूर्ण चेहरा झाकूनच उन्हात जा.9 / 9दररोज दिवसांतून ५ मिनिटे बसल्या बसल्या किंवा काही काम करताना वेगवेगळे फेस योगा म्हणजेच चेहऱ्याचे व्यायाम आठवणीने करा. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.