Skin Care: मेकअप न करताही चेहरा दिसेल तेजस्वी, ७ सोपे उपाय-चेहऱ्यावरुन नजर हटणार नाही
Updated:July 31, 2025 18:10 IST2025-07-31T17:44:07+5:302025-07-31T18:10:40+5:30

त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमीच महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची किंवा मेकअप करण्याची गरज नसते. रोजच्या रोज काही साध्या सोप्या गोष्टी केल्या तरी चेहऱ्यावरचा ग्लो टिकून राहू शकताे.
या काही स्किन केअर टिप्स अशा आहेत ज्या सगळ्यांना अगदी सहज जमू शकतील. त्यासाठी काहीही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाही.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचा चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो.
तुमच्या रोजच्या जेवणात भाज्या आणि सलाड यांचे प्रमाण चांगले असायला हवे. हंगामी फळं भरपूर प्रमाणात खाण्यावर भर द्या. फळांमधून मिळणारे ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते.
त्वचेवरचे टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचा चमकदार करण्यासाठी मुलतानी माती, बेसन, मसूर डाळीचे पीठ, कोरफडीचा गर, कॉफी पावडर, मध, दही, लिंबू अशा घरगुती पदार्थांचा वापर करा.
दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा स्वच्छ धुवा आणि त्याला व्यवस्थित मॉईश्चराईज करा.
रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला थोडेसे साजूक तूप, गुलाब जल, ग्लिसरिन यापैकी काहीतरी लावून मालिश करा.
उन्हात जाण्याआधी चेहऱ्याला आठवणीने सनस्क्रिन लावा आणि संपूर्ण चेहरा झाकूनच उन्हात जा.
दररोज दिवसांतून ५ मिनिटे बसल्या बसल्या किंवा काही काम करताना वेगवेगळे फेस योगा म्हणजेच चेहऱ्याचे व्यायाम आठवणीने करा. यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.