ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

Updated:May 2, 2025 17:40 IST2025-05-02T17:30:51+5:302025-05-02T17:40:58+5:30

7 Natural Exfoliators To Minimize Pores Without Drying Skin : 7 Natural Exfoliators to Minimize Pores Without Drying Skin : How to Get Rid of Large Pores 7 Ways : How to get rid of large pores The top 7 ways : 7 Best Natural Homemade Face Scrubs To Exfoliate Skin : त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी कोणते ७ पदार्थ आहेत फायदेशीर, ते पाहा...

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

वयोमानाप्रमाणेच आपल्या त्वचेत देखील बदल (7 Natural Exfoliators To Minimize Pores Without Drying Skin) होत जातात. वय वाढलं की त्वचेच्या अनेक समस्या सतावू लागतात. पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तर वाढतातच पण आणखी एक समस्या बहुतांशजणींना त्रास देते, ती म्हणजे त्वचेवर वाढू लागले ओपन पोअर्स. विशेषत: गालावर तर ओपन पोअर्स खूप जास्त स्पष्टपणे दिसून येतात.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर असे ओपन पोर्स दिसू लागले की, चेहऱ्यावरची (How to Get Rid of Large Pores 7 Ways) कोमलता, नाजूकपणा जाऊन चेहरा जास्तच वयस्कर वाटू लागतो. त्वचेवरील असे ओपन पोर्स कमी करण्यासाठी आपण घरच्याघरी काय उपाय करु शकतो ते पाहूयात.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी आपण ओट्स आणि दही एकत्रित मिसळून स्क्रब तयार करू शकतो. या स्क्रबने मसाज केल्यास ओपन पोर्स स्वच्छ होतात तसेच ओपन पोर्सचा आकार बऱ्यापैकी कमी होतो आणि त्वचा कोमल दिसू लागते.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

तांदुळाचे पीठ आणि गुलाबपाणी हे उत्तम एक्सफॉलिएटर मानले जातात. तांदुळाच्या पिठामुळे सैल पडलेली त्वचा टाईट होण्यास मदत मिळते, तसेच ओपन पोर्सची समस्या देखील हळूहळू कमी होते. इतकेच नव्हे तर गुलाब पाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचा नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराइझ देखील केली जाते.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

पपईचा गर हा ओपन पोर्सच्या समस्येवर अगदी उत्तम उपाय आहे. ताज्या पपईचा गर काढून ओपन पोर्स असलेल्या भागावर याने मसाज करावा. पपईमधील एन्झाइम्स ओपन पोर्स कमी करण्यास अधिक फायदेशीर ठरतात.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

कॉफी आणि मध ओपन पोर्ससाठी अधिक फायदेशीर मानले जाते. यासाठी एका बाऊलमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात मध घालावे. कॉफी आणि मध यांच्या एकत्रित मिश्रणाने त्वचेला मसाज करून घ्यावा यामुळे ओपन पोर्स आतून स्वच्छ केले जातात. ओपन पोर्स बंद करण्यासाठी कॉफी आणि मध सर्वोत्तम मानले जाते.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यास मदत करतात. साखर त्वचेला नैसर्गिक पद्धतीने स्क्रब करते. यामुळे ग्रीन टी आणि साखरेच्या मिश्रणाने ओपन पोर्सची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी मसूर डाळ वाटून त्याची पेस्ट तयार करावी. या पेस्टने ओपन पोर्सवर हलकेच मसाज करून घ्यावा. यामुळे ओपन पोर्स हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

मुलतानी माती आणि दूध यांच्या एकत्रित मिश्रणाने त्वचेला मसाज करून घ्यावा. मुलतानी माती ओपन पोर्स आतून स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरते. मुलतानी माती आणि दूध या फेसमास्कमुळे ओपन पोर्स हळूहळू कमी होतात.