1 / 8आईस फेशियल म्हणजेच त्वचेला बर्फाने मसाज करण्याचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. पण नेहमीच साध्या बर्फाने मालिश करण्यापेक्षा पुढे सांगितलेले वेगवेगळे आईस क्यूब वापरून चेहऱ्याला मालिश केली तर त्याचा त्वचेला जास्त फायदा होईल. (5 types of ice cubes for glowing skin)2 / 8राईस वॉटर आईस क्यूबने त्वचेला मालिश केल्यास त्वचा टाईट होते, डार्क स्पॉट कमी होऊन त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.(how to keep skin young and glowing?)3 / 8ॲलोव्हेरा आईस क्यूबने त्वचेला मालिश केल्यास त्वचा हायड्रेटेड राहाते आणि तिचा कोरडेपणा कमी होतो. यासाठी कोरफडीचा गर आणि गुलाबपाणी मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या आणि त्याचे आईस क्यूब तयार करा.(home hacks for radiant glowing skin)4 / 8हळद आणि पाणी यांच्या मिश्रणाचे आईस क्यूब तयार करा. त्यात थोडं गुलाब जलही घाला. यामुळे ॲक्ने, पिंपल्स कमी होतात. त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.5 / 8बीटरुटचा रस काढून त्याचे आईस क्यूब तयार करा आणि त्याने त्वचेला मालिश करा. त्वचेवर इंस्टंट ग्लो येण्यासाठी हा उपाय खूप उत्तम आहे.6 / 8कच्चं दूध आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणाचे आईस क्यूब तयार करून चेहऱ्यावर चोळल्यास टॅनिंग कमी होते आणि त्वचा मऊ होते.7 / 8काकडीचा रस आणि गुलाब पाणी सम प्रमाणात घेऊन त्याचे आईस क्यूब तयार करा. डार्क सर्कल्स, ॲक्ने कमी होतात. त्वचा नितळ, स्वच्छ आणि चमकदार होते. 8 / 8हे उपाय vaishnavvi.taneja या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले असून वरीलपैकी कोणताही उपाय करण्याच्या आधी पॅचटेस्ट जरूर घ्या.