पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

Updated:October 28, 2025 12:17 IST2025-10-28T12:12:04+5:302025-10-28T12:17:07+5:30

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

पिंपल्स येण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर पुढे सांगितलेले काही घरगुती उपाय नियमितपणे करून पाहा. यामुळे शरीर आतून शुद्ध होईल आणि पिंपल्स येण्याचं प्रमाण हळूहळू कमी कमी होत जाईल.

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

काही दिवस नियमितपणे ॲव्हाकॅडो खायला सुरुवात करा. कारण त्यामध्ये असणारे काही घटक स्किन काेलॅजीन वाढण्यास मदत करतात. त्यामुळे पिंपल्स कमी होऊन त्वचा नितळ, स्वच्छ होते.

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

दररोज काकडीचा रस प्या किंवा काकडी अगदी बारीक चावून खा. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहाते. शिवाय काकडीमध्ये असणारे काही घटक शरीर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपोआपच पिंपल्सचे प्रमाण कमी होते.

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

आवळ्यामध्ये पॉलीफिनॉल असते. ते देखील लिव्हरचे कार्य सुधारून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यामुळे रोज एक ताजा आवळा खा किंवा मग आवळ्याचा हंगाम नसेल तेव्हा आवळा ज्यूस प्या.

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायलं तर शरीर आपोआप डिटॉक्स होण्यास मदत होते.

पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब

आहारातले तेलकट, तुपकट पदार्थ कमी करा तसेच काही दिवस गोड खाणंही टाळा. या ५ गोष्टी काही दिवस सांभाळल्या तर पिंपल्स नक्कीच कमी होतील.