1 / 10 १. उन्हाचा पारा आता चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे उष्णतेमुळे आताच अंगाची लाही लाही होत आहे...2 / 10२. अशा कडक उन्हात जाऊन आजारी पडू नये म्हणून आपण तब्येतीची जशी काळजी घेतो, तशीच काळजी आता आपल्या त्वचेचीही घेणं गरजेचं आहे.3 / 10 ३. उन्हाळ्यात घाम खूप येताे. त्यामुळे शरीरातली पाणी पातळी कमी होते. पाण्यासोबतच ग्लुकोज, सोडियम आणि आपल्याला उर्जा देणारे, फ्रेश ठेवणारे घटकही निघून जातात आणि मग अशक्तपणा येतो.4 / 10४. त्यामुळेच तर उन्हाळ्यात आपली त्वचाही कोमेजलेली, थकलेली दिसते. त्वचेला फ्रेश ठेवणं हे उन्हाळ्यात एक मोठंच आव्हान असतं. कारण शरीरासोबतच आपली त्वचाही डिहायड्रेट होते आणि मग निस्तेज, डल दिसू लागते. 5 / 10५. म्हणूनच तर उन्हाळ्यातही फ्रेश, टवटवीत त्वचा हवी असेल तर आहारात या ५ पदार्थांचा सहभाग अवश्य वाढवा.. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि त्वचेचा पोत सुधारतो.6 / 10६. उन्हाळ्यात टरबूज खायला विसरू नका. टरबुजामध्ये खूप जास्त पाणी असतं. त्यामुळे त्वचेतीला आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी टरबूज खायलाच पाहिजे.7 / 10७. टरबुजाच्या जोडीने येणाऱ्या खरबुजालाही विसरून चालणार नाही. खरबुजातही भरपूर पाणी असतं. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसणं, डिहायड्रेट होणं हे त्रास टाळायचे असतील तर खरबूज खा.8 / 10८. ताक हे उन्हाळ्यासाठीचं आणखी एक सूपर ड्रिंक आहे. वेळ कमी असेल तर मसाला ताक बनविण्याच्या फंदात पडू नका. नुसतं मीठ आणि जिरेपूड घालून दही हलवा, त्यात पाणी टाका आणि मस्त गारेगार ताक प्या. ताकात शक्यताे साखर नकोच. जिरे शरीराला थंडावा देतात. त्यामुळे जिरेपूड अवश्य वापरा. 9 / 10९. काकडी खाण्याचं प्रमाण वाढवा. काकडीमध्ये जवळपास ८० टक्के पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता टाळण्यासाठी काकडी उपयोगी ठरते.10 / 10 १०. लिंबू सरबत घेणं हा देखील एक उत्तम उपाय. लिंबातून व्हिटॅमिन सी मिळतं, जे त्वचेचं पोषण करतं.