त्वचेला नेहमीच तरुण- सुंदर ठेवणाऱ्या ५ साध्या, सोप्या गोष्टी! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही
Updated:September 4, 2025 14:51 IST2025-09-04T14:42:47+5:302025-09-04T14:51:15+5:30

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर नेहमीच खूप महागडे कॉस्मेटिक्स वापरले पाहिजेत, महागडे फेशियल आणि क्लिनअप केले पाहिजे, असं मुळीच नाही.(5 simple and easy tips for young and beautiful skin)
काही साध्या- सोप्या गोष्टी करूनही त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवता येतं. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(how to get glowing skin with easy tips and tricks?)
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी योग्य प्रमाणात पित आहात का याकडे लक्ष द्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते. त्याचा खूप चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो. तसेच त्वचा नॅचरली हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहण्यास मदत होते.
१ ग्लास ताक रोज प्या. ताकामधून तुम्हाला जे प्रोबायोटिक्स मिळतात ते त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात.
जवस, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया या ओमेगा ३ फॅटी ॲसिड देणाऱ्या पदार्थांचं आहारातलं प्रमाण वाढवा.
बदाम आणि अक्रोड देखील रोज खा. कारण त्यांच्यामधून मिळणारं व्हिटॅमिन ई त्वचा दिर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी मदत करतं.
त्याचप्रमाणे प्रोटीन्स आणि लोह देणारे पदार्थही रोज नियमितपणे खा. या पदार्थांमुळेही त्वचेचं सौंदर्य, तारुण्य खुलून येतं. टिकून राहातं.