अंगावर आलेली पुरळ गायब करणारे ५ स्क्रब, खाज-जळजळ-लाली यांची चिंताच विसरा
Updated:March 25, 2025 18:57 IST2025-03-25T18:50:26+5:302025-03-25T18:57:20+5:30
5 scrubs that will make your acne disappear, forget about itching, burning, and redness : पाहा हे घरगुती स्क्रब. वापरायला सोपे आणि एकदम फायदेशीर. काही दिवसांमध्ये पुरळ नक्कीच कमी होईल.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरावर पुरळ उठून सारखी खाज सुटते. ऊन्हामध्ये गेल्यावर खाजेचे प्रमाण वाढते. जळजळ होते. चेहराच नाही तर शरीरभर असे पुरळ उठते.
सूर्यप्रकाश तसेच हार्मोनल बदल या कारणांमुळे पुरळ शरीरावर उठते. तसेच काही औषधांचा दुष्परिणामही असू शकतो. इतरही काही वैद्यकीय कारणे असू शकतात.
हे पुरळ जर बराच काळ तसेच राहीले तर, त्याचे डाग जाता जात नाहीत. ते काळे पडतात. असे होऊ नये म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही घरगुती उपाय आहेत त्यांचाही वापर करा. विकतच्या साबणांपेक्षा हे घरगुती स्क्रब वापरून पाहा. पुरळ नक्कीच कमी होईल.
बाजारात कॉफीपासून तयार केलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स मिळतात. ते वापरण्यापेक्षा चमचाभर कॉफी पावडर खोबरेल तेलामध्ये मिक्स करा आणि त्या मिश्रणाचा वापर करून शरीर स्क्रब करा.
हळद त्वचेसाठी प्रचंड औषधी असते. चमचाभर हळद, चमचाभर बेसन थोडेसे दही एकत्र करा. छान मिक्स केल्यानंतर त्याने मसाज करा. नंतर धुऊन टाका.
एक केळं घ्या. ते कुसकरून घ्या. त्यामध्ये चमचाभर ओटमील घाला. दोन्ही पदार्थांचे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्या. नंतर चेहर्याला किंवा पुरळ आलेल्या इतर अवयवांवर लावा. थोडावेळ ठेऊन मग धुऊन टाका.
चमचाभर मध घ्या. त्यामध्ये थोडी साखर घाला. थोडे दूध घाला. ते मिश्रण छान मिक्स करा मग त्वचेवर लावा आणि मसाज करा.
थोड्या स्ट्रॉबेरी घ्या. त्या कुसकरून घ्या. त्यामध्ये थोडे दही घाला. छान मिक्स करून घ्या. नंतर १५ मिनिटांसाठी लावा मग धुऊन टाका.