Join us

Skin Care Home Remedies : टॅनिंग-डेडस्किन वाढल्याने त्वचेचा रंग बदलला? आंघोळीच्या वेळी चेहऱ्याला लावा 'हे' पदार्थ- त्वचा चमकेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 15:14 IST

1 / 8
बऱ्याचदा आपण रोजच्या धावपळीत एवढे जास्त अडकलेलो असतो की चेहऱ्याची काळजी घ्यायला पुरेसा वेळ मिळतच नाही.
2 / 8
त्यामुळे मग टॅनिंग, डेडस्किन अशा गोष्टी वाढत जातात आणि मग चेहरा थोडा काळसर वाटू लागतो (how to get rid of tanning and dead skin?). चेहऱ्यावरचं तेज, ग्लो कमी झाल्यासारखा वाटतो.(home remedies for glowing skin)
3 / 8
तुमच्याही चेहऱ्याच्या बाबतीत असंच झालं असेल तर इतर कोणतेही महागडे सौंदर्योपचार न करता हे काही सोपे घरगुती उपाय करा (5 kitchen ingredients helps for skin nourishment in summer amd monsoon). पुढे जे काही पदार्थ सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला सोपा वाटेल तो पदार्थ घ्या आणि आंघोळीच्यावेळी साबण किंवा फेसवॉश वापरण्याऐवजी चेहऱ्याला त्या पदार्थाने मसाज करा. काही दिवसांतच तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
4 / 8
बेसन हा एक सगळ्यात उत्तम पारंपरिक उपाय आहे. बेसन पीठामध्ये गुलाबजल, दही, कच्चे दूध यापैकी काहीही घालून त्याची पेस्ट करा आणि चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल.
5 / 8
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी मुलतानी मातीचा फेसपॅक लावणे खूप फायदेशीर ठरते. मुलतानी मातीमुळे डेडस्किन जाऊन त्वचा छान मऊ होते.
6 / 8
ज्यांना पिंपल्सचा खूप त्रास होतो त्यांनी मध लावून चेहऱ्याला मसाज करावा. मधामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक त्वचेची काळजी घेऊन त्वचेला नॅचरली हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.
7 / 8
दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेसाठी उत्तम ठरते. दह्यामुळे टॅनिंग कमी होते.
8 / 8
कोरफडीचा ताजा गर त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतो. यामुळे त्वचा छान हायड्रेटेड राहण्यासही मदत होते. तसेच पिंपल्सचा त्रास असणाऱ्यांनाही कोरफडीचा गर उपयुक्त ठरतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीमोसमी पाऊससमर स्पेशल