Join us   

केसांच्या ५ तक्रारी सांगतात तुमच्या बिघडलेल्या तब्येतीची लक्षणं, दुर्लक्ष करणं पडतं महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 6:54 PM

1 / 9
१. आजकाल जवळपास प्रत्येकालाच केसांची कोणती ना कोणती समस्या जाणवते आहे.. कुणाचे केस खूपच गळतात (hair fall), तर कुणाच्या केसांत खूप जास्त कोंडा होतो..(dandruff)
2 / 9
२. ऊन, धुळ, प्रदुषण या काही गोष्टी केसांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आहेतच.. पण त्यासोबतच अपुरं पोषण हे देखील केसांच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण आहे.
3 / 9
३. जंकफुडचं वाढलेलं प्रमाण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आपल्या आहारात अनेक कमतरता राहून जातात. त्याचाच परिणाम केसांच्या वाढीवर आणि केसांसंबंधी इतर समस्यांवर दिसून येतो.(hair care tips)
4 / 9
४. म्हणूनच तर तुमच्या केसांची कोणतीही समस्या ही केवळ तुमच्या केसांचीच नसते. तर तिचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी असतो. म्हणूनच तर तुमच्या केसांची नेमकी तक्रार कोणती आणि तिचा आरोग्यावर काय परिणाम होतो किंवा झालेला असतो, हे या भागात जाणून घेऊया..
5 / 9
५. केस धुतल्यानंतर बाथरुममध्ये खूप जास्त केस गळालेले (hair fall) दिसणं हे धोक्याचं आहे. शाम्पूमध्ये झालेला बदल हे एक त्याचं कारण असू शकतं. पण खूप जास्त केस गळणे म्हणजे शरीरातील लोह, बायोटीन यांचं प्रमाण खूप कमी होणे किंवा शरीरात बरेच हार्मोनल बदल होणे, हे असू शकतं.
6 / 9
६. केस खूपच पातळ झाले (thin hair) असतील तर शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असू शकते. पालेभाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या जात नसतील, तर असा त्रास जाणवू शकतो. यासाठी आहारातलं फळाचं आणि पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा.
7 / 9
७. केसांना फाटे फुटत (splited hair) असतील तर शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे लक्षात घ्या आणि आहारात दूध, दही, पनीर, राजमा, कडधान्ये यांचा समावेश वाढवा.
8 / 9
८. डोक्यात वारंवार कोंडा (dandruff) होत असेल तर डोक्याची त्वचा कोरडी पडली असते. याचे कारण म्हणजे हेअर प्रॉडक्ट्समध्ये वारंवार बदल करणे, केसांची नीट स्वच्छता न ठेवणे किंवा मग खूप जास्त शाम्पू लावणे. याव्यतिरिक्त या समस्येचं आरोग्याशी संबंधित कारण म्हणजे शरीरातील झिंक, व्हिटॅमिन बी ६, बी २ आणि बी १२ यांचं प्रमाण कमी होणे.
9 / 9
९. केस अकाली पांढरे (gray hair) होऊ लागले असतील तर आहारात व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ तसेच ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे पदार्थ घ्यावेत.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआरोग्यहेल्थ टिप्स