गळणाऱ्या केसांमुळे वैताग आला? ‘ही’ ५ फळं रोज खाल्ली तर केसांची मुळं पक्की होऊन केस वाढतील भरभर
Updated:October 25, 2025 14:32 IST2025-10-25T12:40:36+5:302025-10-25T14:32:53+5:30

केस गळण्याच्या समस्येमुळे हल्ली कित्येकजण वैतागलेले आहेत. केसांना मिळणारं अपुरं पोषण हे त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे.
म्हणूनच केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्यांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होण्यासाठी काही फळं तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवीत. ती फळं नेमकी कोणती ते पाहा..
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारी फळं खा. आवळा, स्ट्रॉबेरी, लिंबू, संत्री, मोसंबी, किवी अशी फळं तुम्ही खाऊ शकता. या फळांमुळे कोलॅजीन वाढतं आणि ते केसांसाठी गरजेचं असतं.
झिंकयुक्त पदार्थ खाण्यावरही भर द्यायला हवा. यासाठी पालक, काजू, मसूर, टोफू हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात नसतील तर केस कुमकुवत होतात. त्यामुळे प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावरही भर द्या.
स्काल्प कोरडा असल्यानेही केसांची चांगली वाढ होत नाही. त्यासाठी तुमच्या आहारात ओमेगा ३ देणारे पदार्थ असायला हवे. अक्रोड, बदाम, जवस या पदार्थांमधून ओमेगा ३ मिळते.
केसांच्या चांगल्या वाढीसाठी गाजर, ओट्स यासारखे बायोटीनयुक्त पदार्थही खाणंही खूप गरजेचं आहे.