1 / 7वेणी घालणे ओल्ड फॅशन वाटते? मुळात तसे नसून वेणी हा फार सुंदर दिसणारा आणि आरामदायी प्रकार आहे. त्यामुळे केसांची वेणी बांधणे फायद्याचे ठरते. 2 / 7केसांत गुंता कमी होतो, केस कमी गळतात आणि पटकन तुटतही नाहीत. वेणी घातल्यावर हे सगळे फायदे मिळतात. वेणी विविध प्रकारे घालता येते. पाहा ५ हेअरस्टाइल. 3 / 7सगळ्यात मूलभूत आणि पारंपरिक वेणी. केस तीन भागांत विभागून बांधली जाते. शाळेत जाताना अशी वेणी घातली जाते. त्यामुळे केस चांगले राहतात. गुंतत नाहीत. 4 / 7सागर वेणी भारतात फार लोकप्रिय आहे. ही एकदा बांधली की लगेच विस्कटत नाही. बराच वेळ तशीच राहते. केस गुंततही नाहीत. दिसतेही सुंदर. 5 / 7दोन वेण्या आधी फक्त लहान मुली घालत असत. मात्र आता दोन वेण्या घालणे एक फॅशन आहे. अनेक जणी ऑफीसला तसेच कॉलेजमध्ये जायलाही अशी वेणी घालतात. 6 / 7डच वेणी बांधायला जरा वेळ जास्त लागतो, मात्र दिसते सुंदर तसेच जगभरातील मुली ही फॅशन फॉलो करतात. नक्की करुन पाहा. 7 / 7वॉटर फॉल ब्रिड्स हा एक फार मस्त दिसणारा प्रकार आहे. त्यात अर्धीच वेणी घातली जाते. बकी केस मोकळे असतात. फार वेगळी आणि भारी हेअरस्टाइल आहे.