1 / 6खोबरेल तेलाचा वापर आपल्याकडे जास्त करुन केसांना लावण्यासाठीच (5 Beauty Hacks of Coconut Oil) केला जातो. परंतु खोबरेल तेल हे फक्त केसांसाठीच नव्हे तर त्वचेसाठीही (Natural Beauty Remedies with Coconut Oil) एक नैसर्गिक टॉनिक मानले जाते. त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असल्याने अनेक स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यास मदत होते. विशेष म्हणजे, त्वचेच्या वेगवेगळ्या समस्येनुसार खोबरेल तेलात काही घरगुती नैसर्गिक पदार्थ मिसळून लावल्यास त्याचा परिणाम अधिक खोलवर आणि चांगला होतो. 2 / 6आपल्याला असं वाटत की खोबरेल तेल फक्त ( Coconut Oil for Skin) केसांसाठीच फायदेशीर आहे. पण, खोबरेल तेलाचे फायदे केवळ केसांपुरते मर्यादित नाहीत, तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवरही ते अधिक फायदेशीर आहे. खोबरेल तेलामध्ये काही विशिष्ट नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या कमी करू शकता.3 / 6नारळाच्या तेलात साखर मिसळून ब्लॅकहेड्स असलेल्या जागेवर हलक्या हाताने २ ते ३ मिनिटं मसाज करा. यामुळे घरच्या घरीच, तेही फुकटात, ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्वचा मऊसूत बनेल.4 / 6नारळाच्या तेलात कॉफी पावडर मिसळून डार्क सर्कल्सची समस्या कमी करू शकता. यासाठी खोबरेल तेल व कॉफी पावडरची पेस्ट डोळ्यांच्या खाली आणि पापण्यांवर लावा. यामुळे पापण्यांवरील काळेपणा देखील कमी होऊ शकतो. या घरगुती उपायाने डोळ्यांजवळच्या फाइन लाइन्सदेखील कमी करता येतात. 5 / 6त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी, नारळाच्या तेलात बेकिंग सोडा मिसळून आता ही पेस्ट तुम्ही मान, कोपर आणि गुडघे अशा भागांवर लावू शकता. ही पेस्ट हलक्या हाताने लावावा. तसेच, हा उपाय दररोज केल्याने त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होईल. 6 / 6 दातांवरील पिवळसरपणा दूर करुन त्यांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी नारळाच्या तेलात एक चिमूटभर हळद मिसळून घ्यावी. आता तयार पेस्ट ब्रशवर लावा आणि दात हलक्या हाताने घासा. या घरगुती उपायाने तुम्ही कोणत्याही व्हाइटनिंग ट्रीटमेंट किंवा केमिकलशिवाय तुमचे दात चमकदार करू शकता.