1 / 7सणासुदीच्या काळात फ्रेश दिसण्यासाठी चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी करणे खूप गरजेचं असतं. पण त्यासाठी महागडे कॉस्मेटिक्स वापरायला पाहिजेत असे काही नाही.2 / 7आता आपल्या स्वयंपाक घरात नेहमी असणारे असे काही पदार्थ आपण बघूया, जे आपल्या त्वचेसाठी नॅचरल स्क्रब म्हणून काम करतात.3 / 7हे पदार्थ वापरून जर चेहरा स्वच्छ धुतला तर टॅनिंग आणि डेडस्किन निघून जाईल आणि त्वचा अगदी फ्रेश, नितळ, स्वच्छ दिसेल. 4 / 7सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कॉफी पावडर. कॉफी पावडरमध्ये मध आणि दोन ते तीन थेंब खोबरेल तेल घाला आणि याने चेहरा चोळा. चेहऱ्यावर छान ग्लो येईल.5 / 7पिठीसाखर आणि कॉफी एकत्र करून त्यात थोडेसे दही घाला. या स्क्रबने चेहऱ्याला २ मिनिटे मसाज करा. त्वचा छान तुकतुकीत होईल. 6 / 7बेसन पीठ, हळद आणि दही हे कॉम्बिनेशन म्हणजे त्वचेसाठी अतिशय उत्तम असे स्क्रब आहे.7 / 7मसूर डाळीचे पीठ आणि गुलाब जल हे दोन्ही पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल.