केस पातळ झाले? शाम्पू, तेल बदलून उपयोग नाही, 'हे' पदार्थ खा- केस होतील दाट
Updated:December 4, 2025 15:44 IST2025-12-04T15:35:16+5:302025-12-04T15:44:31+5:30

हिवाळा सुरू झाला की केस गळण्याचं प्रमाण खूप वाढतं. अशावेळी मग आपण केसांवर वेगवेगळे शाम्पू किंवा तेल ट्राय करून पाहातो. पण त्याचा उपयोग होतोच असं नाही.
कारण शाम्पू, तेल या गोष्टींमधून केसांना वरवरचं पोषण मिळतं. पण केस मुळातूनच स्ट्राँग करायचे असतील तर काही पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणात असायलाच हवे (4 food items for long and strong hair). त्यामुळे केस गळणं कमी होऊन ते दाट, लांब होतील (super food for healthy long hair). असे पदार्थ नेमके कोणते आहेत ते पाहूया..(food that helps for thick and long hair)
भोपळ्याच्या बिया अगदी नियमितपणे खा. रोज १ चमचा भोपळ्याच्या बिया तरी खायलाच हव्या. त्यांच्यामध्ये झिंक आणि लोह हे दोन्ही भरपूर प्रमाणात असते. शरीरात झिंकचे प्रमाण कमी झाले की त्याचा थेट परिणाम तुमच्या केसांवर होतो. त्यामुळे झिंक वाढविण्यासाठी भोपळ्याच्या बिया खायलाच हव्या.
केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारा दुसरा पदार्थ म्हणजे रताळे. रताळ्यांमध्ये बीटा कॅरेटीन असते जे शरीरात व्हिटॅमिन ए ची निर्मिती करण्यासाठीही कारणीभूत ठरते. बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन ए शरीरात कमी प्रमाणात असेल तर डोक्याची त्वचा कोरडी पडते, केस गळायला सुरुवात होते. त्यामुळे रताळ्यांसह केशरी रंगाच्या इतर भाज्याही जास्त प्रमाणात खायला हव्या.
ओमेगा ३ देणारे पदार्थही नियमितपणे खायला हवे. त्यामुळेही केसांच्या वाढीवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. यासाठी तुम्ही अक्रोड, लाल भोपळा, जवस, चिया सीड्स, पालक असे पदार्थ खाऊ शकता.
पालक आणि इतर हिरव्या भाज्याही रोज खायला हव्या. या भाज्यांमधून लोह, फोलेट, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळते. हे घटक जर तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात असतील तर आपोआपच केस गळती कमी होण्यास मदत होते आणि केसांची चांगली वाढ होते. अशी माहिती आहारतज्ज्ञांनी nutritionistsaloni या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.