1 / 6उन्हाळ्याचं सगळ्यात मुख्य आकर्षण असतं ते आंबा आणि आंब्याचा रस. आमरसाचा आस्वाद घेऊन झाला असेल तर आता त्याचा उपयोग तुमच्या त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी कसा करायचा ते पाहा...2 / 6उन्हाळ्यात त्वचेचं खूप टॅनिंग होतं. अगदी थोडं बाहेर जाऊन आलं तरी लगेच चेहरा काळवंडलेला दिसू लागतो. त्वचेवरचं हे टॅनिंग कमी करून पुन्हा त्वचा चमकदार फ्रेश करण्यासाठी आंब्याचा खूप चांगल्याप्रकारे उपयोग करता येतो.3 / 6चेहऱ्यावर टॅनिंग झालं असेल तर २ चमचे आंब्याचा रस घ्या. त्यात १ चमचा लिंबाचा रस टाका. हे मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. टॅनिंग निघून जाईल.4 / 6१ टेबलस्पून आंब्याचा रस १ टेबलस्पून ग्रीन टी पावडरसोबत मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावा. यामुळे डेडस्किन निघून जाईल आणि त्वचेवर छान चमक येईल5 / 6आंब्याचा रस, मध आणि दही समप्रमाणात घ्या. त्यानंतर ते व्यवस्थित एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे ॲक्ने आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल.6 / 6आंब्याचा रस आणि हळद हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर लावा. लेप सुकल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावर इस्टंट ग्लो येईल.