1 / 8आपण केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक उपाय करतो. तसेच त्वचेसाठीही काही घरगुती उपाय करतो. तसेच विविध प्रॉडक्ट्स वापरतो. मात्र ओठांची काळजी घेणे अनेकदा राहून जाते. त्यामुळे कोमताही ऋतू असला तरी ओठ कोरडे पडतात किंवा फुटतात. 2 / 8ओठांची काळजी घेण्यासाठी फार काही करावे लागत नाही. काही साध्या उपायांचा वापर करायचा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लिप केअर रुटीन करायचे. 3 / 8यासाठी काही खास प्रॉडक्ट्स आणायची किंवा भरपूर खर्च करायची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करुन ओठ मस्त मऊ ठेवता येतात. 4 / 8ओठांचा रंग छान गुलाबी दिसावा. ओठ पांढरे पडू नयेत यासाठी काही मास्क लावायचे. ते लावल्याने ओठ सुके होत नाहीत. दिसतातही छान आणि झोंबत नाहीत. 5 / 8बीटाचा रस ओठांसाठी फारच चांगला असतो. बीटाचे अनेक लिप प्रॉडक्ट्स मिळतात. मात्र घरीच बीटाचा रस काढून त्यात चमचाभर मध घालायचे. मधामुळे त्वचा मऊ होते आणि बीटामुळे त्वचा छान गुलाबी होते. 6 / 8घरी खोबरेल तेल तर असतेच. खोबरेल तेल ओठांसाठी फार चांगले असते. कोरफडीचा अर्क घ्यायचा त्यात थोडे खोबरेल तेल मिक्स करायचे ते मिश्रण झोपण्याआधी ओठांना लावायचे. 7 / 8बरेचदा ओठाची त्वचा निघते. ती चावत बसायची अनेकांना सवय असते. मात्र चावल्यामुळे आणखी त्रास होतो. त्वचा निघत असेल तर खोबरेल तेलात अगदी थोडी साखर मिसळून ते ओठांना लावायचे. त्वचा सारखी निघणार नाही. 8 / 8सतत जीभ फिरवायची सवय असेल तर तसे करु नका. ओठ कोरडे पडतात आणि फुटतात. तसेच दातांनी ओठ चावणे ही सवयही वाईटच. काही सवयी बदलल्यामुळेही फरक पडतो.