डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

Updated:October 4, 2025 16:56 IST2025-10-04T16:48:26+5:302025-10-04T16:56:08+5:30

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

अनेकजणांच्या डोळ्यांभाेवती काळी वर्तुळं दिसतात. त्यामुळे मग त्या व्यक्तींचे डोळे खोल गेलेले दिसतात त्या व्यक्ती आजारी, अशक्त वाटतात.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

आता डार्क सर्कल्स तयार झाले की आपण त्यांच्यावर वरवरचे उपाय करतो. त्यामुळे तेवढ्यापुरते ते कमी होत असले तरी हा त्रास मुळापासून जात नाही. म्हणूनच आता डार्क सर्कल्स येण्यामागची आयुर्वेदिक कारणं समजून घ्या आणि त्यावर योग्य ते उपाय करा.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

ती कारणं नेमकं काेणती आहेत, याविषयीची माहिती डाॅक्टरांनी medhamrut_ayurved या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहेत. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे शरीरातला वात दोष वाढत गेला की डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शरीर जर आतून कोरडं होत असेल तर डोळ्यांभोवतीची वर्तुळं वाढत जातात.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

जे लोक रात्रीची झोप पुरेशी घेत नाहीत तसेच रात्री नेहमीच जागरण करतात त्या लोकांनाही डार्क सर्कल्सचा त्रास होतो. म्हणून रात्रीची झोप शांत आणि पूर्ण होईल याची काळजी घ्या.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

कॉन्स्टीपेशनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनाही डार्क सर्कल्सचा त्रास होतो. त्यामुळे हा त्रास कमी होण्यासाठी भरपूर पाणी प्या. पातळ अन्न खा. यामुळे कॉन्स्टीपेशन आणि डार्क सर्कल्स हे दोन्ही त्रास कमी होतील.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

बदामाच्या तेलाने डोळ्यांभोवती मालिश केल्याने तसेच रात्री झोपण्यापुर्वी काही थेंब बदामाचं तेल गरम पाण्यात टाकून प्यायल्यानेही डार्क सर्कल्सचा त्रास कमी होतो.

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स वाढण्यामागची ३ आयुर्वेदिक कारणं आणि सोपे उपाय- काळी वर्तुळं कमी होतील

शांत झोप येण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी बदामाच्या तेलाने तळपायांना मालिश करा. यामुळे झोप शांत होईल आणि डार्क सर्कल्सही कमी होतील.