Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महिनोंमहिने जातात तरी केस वाढतच नाहीत? जावेद हबीब सांगतात २ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2025 11:42 IST

1 / 6
काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. अगदी कित्येक महिने उलटून गेले तरी इंचभरही केस वाढलेले नसतात.(what to do for hair growth?)
2 / 6
अशा लोकांनी केसांच्या वाढीसाठी नेमके कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(2 simple home hacks for fast hair growth by Jawed Habib)
3 / 6
यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे कांद्याचा रस. कांद्याची टरफलं काढून टाका. त्यानंतर बाकीचा कांदा मिक्सरमधून फिरवून किंवा किसणीने किसून घ्या आणि त्याचा रस काढा. हा ताजा रस केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मालिश करत लावा. केसांची चांगली वाढ होईल.(how to use onion juice for hair growth?)
4 / 6
दुसरा उपाय म्हणजे जावेद हबीब सांगतात की तुम्ही माईल्ड शाम्पू वापरून अगदी रोज केस धुतले तरी चालेल. पण शाम्पू करण्यापुर्वी केसांना तेल मात्र अवश्य लावा. केसांसाठी मोहरी आणि कॅस्टर ऑईल एकत्र करून लावणं अधिक चांगलं.
5 / 6
केस वाढतच नाहीत म्हणून आम्ही ते कापतच नाही.. असं म्हणत केस कापणं थांबवू नका. काही महिने सलग दर तीन महिन्यांनी केस ट्रिम करून पाहा. केसांमध्ये तुम्हाला छान बदल दिसून येईल. त्यांची चांगली वाढ होईल.
6 / 6
कॅस्टर ऑईल, काही थेंब रोजमेरी ऑईल मोहरीच्या तेलामध्ये किंवा खोबरेल तेलामध्ये मिसळा आणि त्याने डोक्याला मसाज करा. यामुळे त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन केसांची मुळं पक्की होतील आणि त्यांची चांगली वाढ होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीकांदा