बाळ जन्माला आल्यानंतर जसं जसे मोठे होऊ लागते तसं तसे ते तोंडात बोट घालतात. (Newborn self-soothing) अनेकदा आपण हे पाहिले असेल. तोंडात बोट घालणे, अंगठा चोखणे ही लक्षणे सामान्य आहेत. परंतु, मुले मोठे होऊ लागली तर ही सवय वाढत जाते. त्यामुळे पालक सतत त्यांच्यावर ओरडतात. (Baby mouth exploration)नवजात बाळ जेव्हा तोंडात बोट घालतात तेव्हा पालकांना वाटते की, त्याला भूक लागली आहे.(Baby sucking behavior) त्यामुळे ते त्याला दूध पाजतात. नुकतेच पालक झाले असाल तर मुलांचे बोटे चोखणे हे भुकेचे लक्षण समजत असाल तर थांबा.(Hunger cues in newborns) नवजात बाळ फक्त भूक लागल्यामुळेच बोटे चोखतात असे नाही इतर अनेक कारणांमुळे देखील ते बोटे चोखतात. याविषयी डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. (Why babies suck fingers)
अनुष्का शर्मा सांगते, मी रोज लेकीसोबत सायंकाळी साडेपाच वाजताच जेवते, रात्री काही खात नाही कारण...
1. चव
नवजात बाळ हे बोटे चोखणे आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी तोंडात घालण्याचा प्रयत्न करते. बालरोगतज्ज्ञ म्हणतात की, बाळ तोंडात बोट घालणे हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा भाग आहे. ज्यामुळे त्यांना पदार्थाची किंवा वस्तूंची चव समजते.
2. दात येणे
३ ते ४ महिन्यानंतर जेव्हा बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुरु होते. तेव्हा त्यांच्या हिरड्या सळसळू लागतात. त्यांना वेदना होतात. अशावेळी बाळ बोटे चोखण्याचा किंवा चावण्याचा प्रयत्न करतात. बोटे चावल्यामुळे हिरड्यांवर दबाव येतो आणि वेदनांपासून आराम मिळतो.
3. शांत राहाण्यासाठी
मानसिकदृष्ट्या शांत वाटण्यासाठी अनेकदा बाळ आपली बोटे चोखतात. जेव्हा त्यांना त्यांना अस्वस्थ वाटते किंवा अधिक ताण येतो तेव्हा असे घडते. बोट चोखल्याने त्यांना शांत आणि आरामदायी वाटते.
4. झोप येत असेल तर...
लहान मुलांना जेव्हा झोप येऊ लागते तेव्हा ती बोटे तोंडात घालतात. जर आपले बाळ दूध प्यायल्यानंतर बोटे तोंडात घालत असेल तर त्याला झोप येत आहे असे समजावे. बाळांना बोटे चोखण्याची सवय लागली की, ते हळूहळू नवजात बाळाच्या नियमित हालचालीचा एक भाग बनते. ज्यामुळे दात आणि हिरड्यांवर परिणाम होतो.