Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > विराट कोहली-रोहित शर्मा सांभाळतात बाळं-बदलतात डायपर, ऐका दमलेल्या बाबाची नवी कहाणी

विराट कोहली-रोहित शर्मा सांभाळतात बाळं-बदलतात डायपर, ऐका दमलेल्या बाबाची नवी कहाणी

Work-life balance of cricketers: Virat Kohli parenting style: Rohit Sharma super dad: विराट आणि रोहित आता आपल्या मुलांसोबत घालवलेल्या छोट्या-छोट्या क्षणांमुळेही चर्चेत असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 16:39 IST2026-03-05T16:31:07+5:302026-03-05T16:39:13+5:30

Work-life balance of cricketers: Virat Kohli parenting style: Rohit Sharma super dad: विराट आणि रोहित आता आपल्या मुलांसोबत घालवलेल्या छोट्या-छोट्या क्षणांमुळेही चर्चेत असतात.

Virat Kohli Rohit Sharma super dad Career ani mulanche sangopan Cricketers parenting balance kaisa karte Indian cricketers as perfect dads Virat Kohli parenting tips Rohit Sharma fatherhood Work-life balance of cricketers | विराट कोहली-रोहित शर्मा सांभाळतात बाळं-बदलतात डायपर, ऐका दमलेल्या बाबाची नवी कहाणी

विराट कोहली-रोहित शर्मा सांभाळतात बाळं-बदलतात डायपर, ऐका दमलेल्या बाबाची नवी कहाणी

भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज नावं म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. मैदानावर आपल्या जबरदस्त फलंदाजीने आणि नेतृत्वाने चाहत्यांची मनं जिंकणारे हे दोन्ही खेळाडू आता आयुष्यातील एका वेगळ्याच भूमिकेत चमकत आहेत, ती म्हणजे ‘सुपर डॅड’ची! (Virat Kohli parenting style) क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षट्‍कारांचा पाऊस पाडणारे विराट आणि रोहित आता आपल्या मुलांसोबत घालवलेल्या छोट्या-छोट्या क्षणांमुळेही चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या या क्षणांचे फोटो-व्हिडिओ पाहून चाहतेही अक्षरशः फिदा होत आहेत. (Rohit Sharma super dad)

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

कुटुंब आणि पालकत्वाबद्दल असणाऱ्या गोष्टी सध्या वेगाने बदलताना पाहायला मिळत आहे. २५ ते ३० व्या वर्षी लग्न करणं आणि ३० ते ३५ व्या वर्षी बाळंतपण करणं हे एकेकाळी सामान्य मानलं जातं होते परंतु सध्या हे चित्र वेगळं पाहायला मिळत आहे. शहरीभागात ४० व्या वर्षांनंतर पालक होण्याचा ट्रेंड झपाट्याने पाहायला मिळत आहे. आधी करिअर, आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊन मग कुटुंबनियोजनाचा प्लान करतात. यात बॉलिवूडदेखील मागे नाही. 

एका यशस्वी खेळाडूचे आयुष्य म्हणजे शिस्त, प्रवास आणि प्रचंड दबाव असतो. अशा परिस्थितीत कुटुंबाला वेळ देणे हे मोठं आव्हान असतं. पण, विराट आणि रोहितने याला एक नवी दिशा दिली आहे. 'मुले मोठी झाल्यावर पाहू' ही जुनी विचारसरणी बाजूला सारून, ते आपल्या मुलांच्या छोट्या-छोट्या आनंदाचे साक्षीदार बनत आहेत.

विराट कोहलीच्या बाबतीत सांगायचे तर, तो मैदानावर जितका आक्रमक असतो, तितकाच घरी शांत आणि लाडका बाबा आहे. वमिका आणि अकाय यांच्यासोबत वेळ घालवतानाचा त्याचा 'सुपर डॅड' अंदाज चाहत्यांनी अनेकदा अनुभवला. मुलांसोबत खेळणे, त्यांना फिरायला नेणे आणि त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर हजर राहणे, ही त्याची प्राथमिकता. करिअर आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा, याचे उत्तम उदाहरण सध्या विराट अनेकांना देत आहे 

तर रोहित शर्माची कूल स्टाईलच त्याला उत्तम बाबा बनवते. समायरासोबतचा त्याचा मस्तीखोर स्वभाव असो किंवा तिला मैदानात आपल्या खांद्यावर फिरवणे असो, रोहित नेहमीच एक प्रेमळ बाप म्हणून समोर आला आहे. मुलांच्या संगोपनात फक्त आईची जबाबदारी नसते, तर वडिलांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो, हे या स्टार्सनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं

आजचे पालक कुटुंबनियोजन करण्यापूर्वीच फार विचार करतात. करिअरमध्ये इतके व्यस्त असतात की, त्यांना मुलांच्या बालपणाचा आनंद सुद्धा घेता येत नाही. अशावेळी विराट-रोहितचं हे सुपर डॅड रुप अनेकांना प्रेरणादायी ठरतं आहे. मुलांसोबत घालवलेला वेळ त्यांना फक्त संस्कारच देत नाही तर त्यांच्या आत्मविश्वास देखील निर्माण करतो. पूर्वी, उशिरा लग्न करणे किंवा मुले होणे हे नेहमीच दुर्लक्षित केले जात असं, पण आता, शहरी समाजात, ते वैयक्तिक निवड म्हणून पाहिले जाते. आधी करिअर, नंतर कुटुंब हे सूत्र अनेक तरुण व्यावसायिकांना आकर्षित करत आहे. 

एकंदरीत, पालकत्वाचा हा नवीन ट्रेंड कुटुंबाची नवीन व्याख्या तयार करत आहे. लोक त्यांच्या सोयी, आर्थिक परिस्थिती आणि मानसिक तयारीनुसार निर्णय घेतांना पाहायला मिळत आहे. भविष्यात, ४० वर्षांनंतर पालक होणे हे २५ व्या वर्षी लग्न करण्याइतके सामान्य होऊ शकते. 
 


Web Title : विराट कोहली और रोहित शर्मा: थके हुए पिताओं की एक नई कहानी

Web Summary : विराट कोहली और रोहित शर्मा, क्रिकेट सितारे, अब समर्पित पिता के रूप में चमक रहे हैं। वे अपने करियर और परिवार को संतुलित करते हैं, सक्रिय रूप से अपने बच्चों के जीवन में भाग लेते हैं। यह कई लोगों को प्रेरित करता है, जो शामिल पितृत्व और परिवार नियोजन के लिए एक आधुनिक दृष्टिकोण का प्रदर्शन करते हैं।

Web Title : Virat Kohli and Rohit Sharma: A New Tale of Exhausted Dads

Web Summary : Virat Kohli and Rohit Sharma, cricket stars, now shine as dedicated dads. They balance careers with family, actively participating in their children's lives. This inspires many, showcasing a modern approach to involved fatherhood and family planning.