Join us  

सेरेना विल्यम्स म्हणते, झाले मी जाड-बेढब, मग काय झालं? आई झाल्यानंतर आरशात पाहिलं आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 5:49 PM

वाढलेलं वजन, बेढब शरीर ही मीच आहे का? सेरेनाने स्वत:लाच प्रश्न विचारला..

ठळक मुद्देसेरेनानं आईपणाचा निखळ आनंद घेण्याचा सांगितलेला मंत्र म्हंटलं तर किती सोपा आहे ना?

आईपण म्हणजे आनंद पण, आईपणाचा प्रवास हा सरळ आणि सुखद कधीच नसतो. या प्रवासात अत्युच्य सुखाचे क्षण वाट्याला येतात तसे निराश करणारे क्षणही वाट्याला येतात. स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सही तेच सांगते. सेरेना दुसऱ्यांदा आई झाली.

ती म्हणते, आई जेव्हा बाळासोबत स्वत: ला बघते तेव्हा तिला ती जगातली सर्वांत आनंदी स्त्री वाटते. पण, एकटी स्वतंत्रपणे आरशासमोर उभी राहते तेव्हा मात्र तिला बाळंतपणात बेढब झालेलं आपलं शरीर खुपू लागतं. ही आपणच आहोत का? आपलं हे असं का झालं? असे प्रश्न तिला पडतात. अनेकदा आपण आपल्यालाच आवडेनासे होतो. अशावेळी आरशात दिसणाऱ्या स्वत: ला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची गरज आहे. सांगावं स्वत: लाच की, माझं माझ्यावर खूप प्रेम आहे! मी आता या क्षणी कशीही दिसत असली तरीही! मी स्वत: ला हेच सांगितलं आणि त्यानंतरचं माझं बाळासोबतचं जगणं आणि स्वत:सोबतचं असणं दोन्ही सुंदर झालं.’

(Image : google)

सेरेनाला दुसरी मुलगी झाली. आदिरा रिव्हर तिचं नाव. आदिरासोबत सेरेनाने एका क्रूझवरचा बिकनी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सेरेना म्हणते, ' मला माहीत आहे, आता माझं शरीर हे 'पिक्चर परफेक्ट' नाही. माझ्या अंगाला सतत दुधाचा वास येतो. पण तरीही माझं माझ्या दिसण्यावर खूप प्रेम आहे. हे माझ्या शरीराचं नव रूप आहे. माझ्या शरीरात झालेला बदल आहे. या बदलामागे एक छान कारण आहे. बाळंतपणानंतर काही महिन्यांनी आपल्याला आपलं शरीराचं सौंदर्य परत मिळवता येतं, त्यासाठी फक्त व्यायाम करायला लागतो इतकंच!’

(Image :google)

सेरेनानं आईपणाचा निखळ आनंद घेण्याचा सांगितलेला मंत्र म्हंटलं तर किती सोपा आहे ना? 

टॅग्स :सेरेना विल्यम्सपालकत्वआरोग्य