परीक्षा जवळ आली रे आली की, अनेकांच्या पोटात गोळा येऊ लागतो. काहींचा अभ्यास तोंड पाठ असतो तर काहींना आपण सगळंच काही विसरुन जावू अशी भीती सतावू लागते. (exam stress student) अनेकदा तर अभ्यास करताना सुद्धा झोप येत राहाते. बोर्डाचे पेपर असले की, मुलांना वर्षभर त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मानसिक ताण अधिक वाढतो.
अभ्यास तर केला पण परीक्षेत काहीच आठवत नाही? ५ टिप्स, मार्क पडतील भरपूर
नुकत्याच सुरु झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात प्रेरक गुरु जग्गी वासुदेव ऊर्फ सद्गगुरु यांनी मनाचा चमत्कार यावर चर्चा केली. (sadhguru advice for student) त्यांनी मुलांना परीक्षेसाठी काही महत्त्वाचे कानमंत्र देखील दिले. (student exam sadhguru advice to study) त्यांच्या अनुभवातून मुलांना ध्यानाचे, एकाग्रतेचे महत्त्व देखील समजावून सांगितले. ते म्हणतात की, शिक्षण म्हणजे आयुष्याची परीक्षा नाही, हे भविष्यात पुढे जाण्याचे साधन आहे. स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता कायम ओळखता यायला हवी. परीक्षेच्या काळात मुलांना अभ्यास करा करावा. मानसिक ताणावर कंट्रोल कसा करायला हवा. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
1. स्वत:वर नियंत्रण ठेवा
अनेकदा परीक्षेच्या टेन्शनमुळे मुलं स्वत:वरील नियंत्रण गमावून बसतात. असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मेंदूला चालना मिळतील अशा गोष्टी करा. ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल.
2.ध्यान करा
जर तुम्ही अभ्यास करताना तो एकसारखाच करत नसाल तर काही गडबड नाही. पण अभ्यास करताना फक्त शरीर उपस्थित आहे आणि मन कुठे दुसरीकडे गेले तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. तुमचे मन आणि शरीर दोन्ही पूर्णपणे एकाग्र असायला हवे. तुमच्या इच्छेनुसार काम आणि ध्यान करा.
3. स्वत:ला कमी लेखू नका
अनेकदा आपण स्वत:ला इतरांसोबत मोजत बसतो. त्यामुळे आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. कधी कधी आपल्याला असेही वाटते की, माझी बुद्धी ही इतरांसारखी का नाहीये. असे करणे चुकीचे आहे. प्रत्येकाच्या आत काही ना काही नवीन दडलेले असते. ज्याचा वापर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी होतो. आपल्याला असणाऱ्या चांगल्या गुणांना नेहमी ओळखता यायला हवे.
4. स्ट्रेस फ्री राहा
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण अधिक प्रमाणात घेऊ नका. शाळा, परीक्षा आणि त्याबाबत घडणाऱ्या गोष्टी या मेंदूच्या विकासासाठी असतात. तुम्ही तुमची बुद्धी जितकी सक्रिय ठेवाल. तितकाच तुमचा मेंदू चांगले कार्य करेल.