हल्लीची मुलं सांभाळणं हे पालकांपुढचं मोठं आव्हान असतं.. आमची मुलं कधी मोठी झाली हे आम्हाला कळालंही नाही, त्यांच्याकडे आम्हाला कधीच विशेष लक्ष द्यावं लागलं नाही.. अशी वाक्य हल्लीच्या पालकांना त्यांच्या मागच्या पिढीकडून वेळोवेळी ऐकायला मिळतात. पण आता मात्र काळ खूप बदलला आहे. जेन झी चे बदलते विचार तर आपल्याला माहितीच आहे. त्यापुढचं एक पाऊल म्हणजे आताची जेन अल्फा.. अभिनेत्री राणी मुखर्जी हिची १० वर्षांची चिमुरडीही याच पिढीची. तिला वाढविताना राणीला नेमकी कोणती आव्हाने येतात, पिढ्यांमधला बदल आई म्हणून ती कसा अनुभवते आहे याविषयी तिने काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत..(Rani Mukerji explains her parenting style about Her Gen Alpha Daughter Adira)
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लेक म्हणजे अधिरा. राणीने तिला आतापर्यंत तरी साेशल मीडियापासून खूप दूर ठेवलं आहे. नुकत्याच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राणी म्हणते की मी कशी वाढले आणि आता माझी मुलगी कशी वाढते आहे, यात खूप मोठं अंतर आहे.
किचनमधला 'हा' पदार्थ बाथरुममध्ये टाका- कितीही पिवळ्या पडलेल्या टाईल्स असू द्या, १० मिनिटांत चकाचक
माझ्या लहानपणी आईने मला एखादा फटका ठेवून देणं अगदी नॉर्मल होतं. पण आता मात्र मी तसं करू शकत नाही. कारण ही जेन अल्फा आहे. त्यांची मतं आतापासूनच ठाम आहेत. ती मुलं खूप स्पष्ट आहेत. मी तिला मारलं तर कदाचित ती ही मला मारू शकते. त्यामुळे प्रत्येक पालकांनाच या पिढीशी खूप सांभाळून वागावं लागतं...
राणी म्हणते त्यात वावगं काहीच नाही. थोडा विचार केला तर पालकांनाही नक्कीच लक्षात येईल की आपण या मुलांच्या वयाचे होतो तेव्हा किती वेगळे होतो. या मुलांना ज्या गोष्टी आता कळतात, त्या गोष्टी त्याकाळी आपल्या डोक्यातही यायच्या नाहीत, एवढं आपण बाकीच्या दुनियेशी अनभिज्ञ होतो.
आता मुलांना जगभरात काय चाललं आहे ते कळतं, त्यांचा अवेअरनेस खूप वाढला आहे. बाहेरच्या जगाशी त्यांना खूप मोठं एक्सपोजर मिळालं आहे. त्यामुळे आपण जसं आपल्या पालकांनी ठरवून दिलेल्या साच्यात घडत जातो, तसंच ही मुलंही घडतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. बदलत्या पिढीला समजून घेणं आणि त्यानुसार आपलीही पालकत्वाची स्टाईल बदलणं हे जास्त शहाणपणाचं ठरतंय..
Web Summary : Rani Mukerji discusses the challenges of raising her Gen Alpha daughter, Adira, noting the stark differences from her own childhood. She emphasizes the need for parents to adapt to this generation's strong opinions and global awareness.
Web Summary : रानी मुखर्जी ने अपनी जेन अल्फा बेटी अदिरा को पालने की चुनौतियों पर चर्चा की, और अपने बचपन से स्पष्ट अंतर को नोट किया। उन्होंने माता-पिता के लिए इस पीढ़ी की मजबूत राय और वैश्विक जागरूकता के अनुकूल होने की आवश्यकता पर जोर दिया।