lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

Parenting Tips: What Sudha Murthy Says About Raising Kids : पालकांच्या नकळत घडणाऱ्या चुकांमुळे मुलं खचू शकतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2024 10:05 AM2024-04-03T10:05:45+5:302024-04-03T10:10:01+5:30

Parenting Tips: What Sudha Murthy Says About Raising Kids : पालकांच्या नकळत घडणाऱ्या चुकांमुळे मुलं खचू शकतात..

Parenting Tips: What Sudha Murthy Says About Raising Kids | वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, आपल्या मुलाने यशाचे शिखर गाठावे (Parenting Tips). संस्कार देण्यापासून ते योग्य वाढ होण्यासाठी विविध गोष्टी करतात. परंतु, टीएनएज मुलांना समजून घेणं हे आव्हानात्मक आहे. मुलं वयात आल्यानंतर त्यांच्या संगोपनात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याची माहिती इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी दिली आहे.

या टिप्सच्या मदतीने आपण किशोरवयीन मुलांचे संगोपन करू शकता. याबाबत त्या सांगतात, 'मुलांमध्ये नैतिक मूल्ये, समाजाप्रती जबाबदारी आणि जगाप्रती सहानुभूतीची भावना असायला हवी' या व्यतिरिक्त मुलांचे संगोपन करताना कोणती काळजी घ्यायला हवी, पाहा(Parenting Tips: What Sudha Murthy Says About Raising Kids).

मुलांना स्वातंत्र्य द्या

सुधा मूर्ती सांगतात, 'मुलांद्वारे आपली स्वप्ने पूर्ण करू नयेत. मुलांच्याही काही इच्छा असतात. प्रत्येक पालकानेही आपल्या मुलाच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रात त्यांना करिअर घडवण्यास साथ द्या.'

गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क

तुलना करणे योग्य नाही

सुधा मूर्ती यांच्या मते, 'तुमच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तुमचे मूल जसे आहे तसे चांगले आहे. त्याच्याजवळ असलेल्या गुणांची प्रशंसा करा.'

स्क्रीन टाइम कमी करा

आजकाल बऱ्याच मुलांचा अधिक वेळ स्क्रीनवर जातो. मुलांची ही सवय चांगली नाही. सुधा मूर्ती म्हणतात, 'मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे. शक्य असल्यास मुलांना पुस्तके वाचण्याचा सल्ला द्या. पुस्तकांमधून भरपूर माहिती मिळते आणि ज्ञानाचा विस्तारही होतो.'

मुलांना वेळ द्या

सुधा मूर्ती सांगतात, 'पालकांनी किशोरवयीन मुलांसोबत अधिक वेळ घालवायला हवा. त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे वागा, यामुळे मुलं न घाबरता सगळ्या गोष्टी शेअर करतील. शिवाय त्यांना जर तुमच्याकडून सल्ला हवा असेल तर, मुलं न घाबरता मनातल्या गोष्टी शेअर करू शकतील.'

पालक हो! तुम्ही '५' चुका कराल तर मुलं बिघडणारच म्हणून समजा; वेळीच या सवयी बदला नाहीतर..

मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू नका

बरेचसे पालक मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. पण यामुळे मुलं हट्टी होतात. त्यामुळे मुलांची सर्व इच्छा पूर्ण करू नका. त्यांना पैश्यांची किंमत समजायला हवी, म्हणून त्यांनी हट्ट धरलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करू नका.'

Web Title: Parenting Tips: What Sudha Murthy Says About Raising Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.