Lokmat Sakhi >Parenting > अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्का मुलांना शिस्त आणि चांगलं वळण लागण्यासाठी करतात ‘या’ गोष्टी रोज

अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्का मुलांना शिस्त आणि चांगलं वळण लागण्यासाठी करतात ‘या’ गोष्टी रोज

Parenting Tips Shared By Abhishek Bachchan and Anushka Sharma: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे आराध्याला शिस्त लावण्यासाठी तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे वामिका आणि अकाय या त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी काय करतात पाहा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 15:34 IST2025-02-14T09:12:01+5:302025-02-14T15:34:02+5:30

Parenting Tips Shared By Abhishek Bachchan and Anushka Sharma: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे आराध्याला शिस्त लावण्यासाठी तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे वामिका आणि अकाय या त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी काय करतात पाहा.. 

parenting tips shared by abhishek Bachchan and Anushka sharma | अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्का मुलांना शिस्त आणि चांगलं वळण लागण्यासाठी करतात ‘या’ गोष्टी रोज

अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्का मुलांना शिस्त आणि चांगलं वळण लागण्यासाठी करतात ‘या’ गोष्टी रोज

Highlightsमुलांवर कधी कधी आपण ओरडतो, चिडतो, वैतागतो.. तसंच काहीसं सेलिब्रिटींचंही होत असेल का? मग ते त्यांना कशी शिस्त लावत असतील?

सेलिब्रिटींबद्दल आपल्याला जेवढं आकर्षण वाटत असतं, तेवढंच आकर्षण त्यांच्या मुलांबद्दलही वाटत असतं. खरंतर आपल्या मुलांसारखीच त्यांची मुलंही असतात. पण त्यांच्याभोवती त्यांच्या पालकांच्या ग्लॅमरचं भलं मोठं वलय असतं. त्यामुळे ती मुलंही आपल्याला वेगळीच वाटतात. सेलिब्रिटींना आणि त्यांच्या मुलांना एकत्र पाहताना बऱ्याचदा असा प्रश्न मनात डोकावून जातो की पालक म्हणून हे सेलिब्रिटी कसे असतील, आपल्या मुलांसारखाच हट्ट त्यांच्या मुलांनीही केल्यावर ते त्यांची समजूत कशी घालत असतील, मुलांवर कधी कधी आपण ओरडतो, चिडतो, वैतागतो.. तसंच काहीसं सेलिब्रिटींचंही होत असेल का मग ते त्यांना कशी शिस्त लावत असतील, त्यांच्या मुलांनी कोणत्या गोष्टी अगदी कटाक्षाने शिकल्याच पाहिजेत असं त्यांना वाटत असेल.. असे अनेक प्रश्न तुमच्याही डोक्यात येत असतील तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय तसेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शेअर केलेल्या या काही पॅरेण्टिंग टिप्स बघाच..(Parenting Tips Shared By Abhishek Bachchan and Anushka Sharma) 

अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्काने शेअर केलेल्या पॅरेण्टिंग टिप्स

 

काही दिवसांपुर्वी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अनुष्का शर्माने सांगितलं होतं की ती आणि विराट दोघेही मुलांच्या रुटीनच्या बाबतीत खूप काटेकोर असून मुलांनाही जेवणाचं आणि झोपण्याचं एक रुटीन हवंच असं त्यांचं म्हणणं आहे.

वाढत्या वयाला लागेल ब्रेक! पंचविशीतलं सौंदर्य कायम टिकून राहील- रोज फक्त 'हे' काम करा..

रात्रीचं जेवण लवकर करण्याची सवय त्यांनी आतापासूनच मुलांना लावली असून मुलांना आपले पारंपरिक पौष्टिक पदार्थ खाऊ घालून त्यांचं संगोपन करण्यावर त्यांचा भर आहे. अनुष्का म्हणते की एखादी गोष्ट त्यांना सांगून शिकवण्यापेक्षा पालकांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवावी. कारण मुलं पालकांच्या वागण्याचं अगदी बारकाईने निरिक्षण करत असतात आणि त्यामुळेच जे पालक करतात ते मुलं आपोआप शिकतात. 

 

अभिषेक बच्चन सांगतो...

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एकदा अभिषेक बच्चन म्हणाला होता की प्रत्येक नवी पिढी ही तिच्या मागच्या पिढीपेक्षा खूप लवकर मॅच्युअर होत असते. अभिषेक- ऐश्वर्याची मुलगी आराध्या सध्या १३ वर्षांची आहे. तो म्हणतो की या वयातल्या मुलांना शिस्तीत ठेवून उपयोग नसतो.

फक्त ३६३ रुपयांमध्ये घ्या आकर्षक क्रॉकरी प्लेट! पैशांची भरपूर बचत करणारी मस्त खरेदी...

तुम्ही पालक म्हणून सांगितलं आणि मुलांनी ते ऐकलं असा जमाना आता नाही. कारण आजच्या मुलांच्या सभोवतालचं वातावरण खूप बदललं आहे. त्यामुळे पालकांनीही त्याच पद्धतीने मुलांशी जुळवून घेतलं पाहिजे. अभिषेक आणि अनुष्का यांच्या पॅरेण्टिंग स्टाईलमध्ये खूप मोठा फरक आहे. याचं कारण त्यांची मुलंही वेगवेगळ्या वयोगटातली आहेत. त्यामुळेच तर लहान मुलांच्या बाबतीत पालकांची भूमिका कशी असावी आणि मुलं वयात आल्यानंतर पॅरेण्टिंग स्टाईल कशी बदलावी हेच या दोन उदाहरणांवरून दिसून येतं.. 
 

Web Title: parenting tips shared by abhishek Bachchan and Anushka sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.