आपल्या मुलांनी मोठे व्हावे, खूप शिकावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. (Premanand Maharaj thoughts) त्यासाठी पालक जीव ओतून मेहनत करत असतात.(importance of parents in life) शाळा, क्लासेस, स्पर्धा परीक्षा अशा विविध ठिकाणी मुलांना भाग घ्यायला सांगतात.(life lessons) आपल्या मुलाला पुढे नेण्यासाठी पैसा, वेळ आणि अधिक कष्ट करतात.(respect for parents) मुलं डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अधिकारी व्हावीत अशी सगळ्यांचीच इच्छा असते.(parenting mistakes) पण प्रेमानंद महाराज म्हणतात मुलं कितीही शिकली तरी एक गोष्ट मात्र त्याच्यात कायमच अपुरी असते आणि याची जाणीव पालकांनाही होत नाही. (value of respect and love towards parents)
चालताना मुलांचे पाय वाकतात- उभेही तिरके राहतात? डॉक्टर सांगतात उपाय - आईबाबांनी काय काळजी घ्यायची..
ते म्हणतात सध्याचे शिक्षण हे आधुनिक झाले आहे पण त्यात अध्यात्माचा प्रभाव असणं देखील महत्त्वाचं. वाढत्या शिक्षणाची आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलांमध्ये नम्रता, प्रेम आणि आदर कमी प्रमाणात पाहायला मिळतो. सुशिक्षित मुलेही नम्रता सोडून अनेकदा वागतात.
सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की, माणूस खूप शिकला की, त्याच्यात अहंकार वाढू लागतो. पण माणसांने कितीही शिकले तरी आपला नम्र स्वभाव कधीही सोडू नये. मुलं कितीही शिकली तरी त्यांना आपल्या आई-वडिलांसाठी वेळ नसो. मोबाईल, सोशल मीडिया किंवा करिअरच्या धावपळीमध्ये ते घरच्यांना वेळ देत नाही. आपले पालक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यांना मुलांच्या प्रेमाची गरज असते. पण अशावेळी ते लांब असतात.
सुशिक्षित व्यक्तीची ओळख ही नेहमी नम्र असायला हवी. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर त्यांनी करायला हवा. त्यांच्याशी नेहमी नम्रतेने बोलायला हवे. आज बरेच लोक खूप शिकले आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत पण त्यांच्यात नम्रतेचे कोणतेही गुण दिसत नाही. मुलांना जन्मापासूनच मोठ्यांचा आदर करायला शिकवा. पालकांना या गोष्टी छोट्या जरी वाटत असल्या तरी याचा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. मुलांना काही गोष्टी अध्यात्मिकतेच्या मार्गाने समजवा. ज्यामुळे त्यांच्यात बदल पाहायला मिळेल.