अभ्यास कर... असं पालकांनी मुलांना ओरडून सांगितल्यावर ते घर डोक्यावर घेतात.(Parenting tips) तर अनेकदा मुलं रडायला लागतात, काहींना चिड येते तर काही जण एकदम शांत बसून काहीच न करणं पसंत करतात.(study habits for children) पालकांना असं वाटतं की, आपलं मूल एवढं हुशार आहे, पण अभ्यासात का लक्ष लागत नाही? ही परिस्थिती प्रत्येक घरात पाहायला मिळते.(how to make child study) पण खरा प्रश्न हा अभ्यासाचा नसतो तर अभ्यासाची पद्धत आणि पालकांचा दृष्टीकोन यांचा असतो.(kids focus tips)
सध्या मुलांचे सगळ्यात जास्त लक्ष हे खेळ, मोबाईल आणि स्क्रिन टाइमकडे असते.(study tips for parents) सतत स्पर्धेचं वातावरण, मार्कांची चिंता आणि पालकांच्या प्रेशरमुळे मुलांना अभ्यास करताना कंटाळा येतो.(kids study motivation) अनेकदा पालक मुलांना ओरडतात, अभ्यास कर नाहीतर फोन काढून घेईन, तु हुशार नाहीस का? यामुळे मुलांवर ताण येतो.(child not studying) त्यांचा मेंदू शिकण्यास तयार नसतो. पण पालकांनी ३ गोष्टी लक्षात ठेवल्यास मुले आवडीने अभ्यास करतील आणि हुशारही होतील.
बुलेट ट्रेनसारखं फास्ट चालेल मुलांचं डोकं, ४ उपाय - अभ्यासात लागेल लक्ष, होतील हुशार
मुलं शाळेचा अभ्यास करताना रडत असतील तर पालकांनी मुलांचे काळजीपूर्वक ऐकायला हवे. नंतर त्यांना अभ्यास करायला सांगा जर त्यांना आता अभ्यास करायचा नसेल तर ठीक आहे. मुलांशी बोलताना त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे. मुलांशी जितके प्रेमाने बोलाल तितक्या लवकर ते आपलं ऐकतात.
मुलांचं मोबाइलचं व्यसन सोडवणाऱ्या ७ गोष्टी; मुलं मोबाइल हातातून खालीच ठेवत नसतील तर काय कराल?
मुलांना अभ्यास करायला बसवताना पालकांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींचा वापर करणे टाळायला हवे. मुलांना जवळ घेऊन प्रेमाने शिकवायला हवं. ज्यामुळे मुलं अधिक गोडीने अभ्यास करतात. पालकांनी नेहमी मुलांना सांगायला हवं आपण एकत्र अभ्यास करुया. ज्यामुळे ते अधिक आवडीने शिकायला तयार होतात.
मुलांना अभ्यास करायचा कंटाळा आला असेल तर पालकांनी त्यांना सांगायला हवे की, अर्धा अभ्यास आता करुया. बाकीचा नंतर कर. त्यामुळे त्यांना मोकळा वेळ मिळेल. मुलांना आवडणाऱ्या विषयांपासून त्यांच्या अभ्यास घेण्यास सुरुवात करा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण भावना ठेवा.थोडेसे बदल, थोडीशी संयमाची साथ आणि योग्य वातावरण असल्यास मुले आवडीने अभ्यास करतील.