Join us

आई-वडिलांच्या 'या' चुकांमुळे मुलांचा आत्मविश्वास होतो कमी, राहतात एकेकटे- स्वभावही होतो चिडखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 13:47 IST

parenting mistakes: child confidence: child behavior issues: पालकांनी मुलांसमोर वागताना काय काळजी घ्यायला हवी.

मुल जन्माला आल्यानंतर पालकांच्या जबाबदाऱ्या वाढतात. फक्त मुलांना खाऊ-पिऊ घालणं आणि शाळेत पाठवणं एवढ्यावर थांबत नाही. (Parenting Tips) मुलं जशी घरात पाहतात, तशीच त्यांची मानसिकता घडते. आई-वडिलांचे बोलणं,त्यांची प्रतिक्रिया हे सगळं मुलांच्या मनावर खोल परिणाम करतं.(Parenting mistake)  म्हणून पालकांनी मुलांसमोर बोलताना- वागताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.(child behavior issues) अन्यथा मुलांचा आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो. त्यांना कामय एकटे वाटू लागते. तसेच त्यांचा स्वभाव देखील चिडचिडा होतो. त्यामुळे पालकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (negative parenting on child behavior)

प्रेमानंद महाराज म्हणतात.., मुलं कितीही शिकली तरी ‘ही’ गोष्ट कधीच शिकत नाहीत- पालकही करतात दुर्लक्ष

प्रसिद्ध पालकत्व प्रशिक्षक जोबानुपात्रा यांनी म्हटलं की मुलं ही कायम आपल्या पालकांना देव मानतात. परंतु, आई-वडील सतत मुलांच्या समोर भांडू लागली की, मुलांची चिडचिड वाढते. त्यांचे अनुकरण करुन मुले घरातील इतर व्यक्तींशी भांडू लागतात. यामुळे मुलांच्या बालमनावर परिणाम होतो. त्यांना असं वाटतं की, आपले आई-वडील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर भांडतात. ज्यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. 

पालकांना सतत मुलांनी भांडताना पाहिले की, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना व्यवस्थित संवाद देखील साधता येत नाही. त्यांना अनेकदा असं वाटतं की, पालक त्यांच्यामुळेच भांडण करत आहेत. ज्यामुळे मुलं स्वत:ला दोष देऊ लागतात. तज्ज्ञांचे मत असं आहे की, याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. आणि यामुळे त्यांची एकाग्रता हळूहळू कमी होऊ लागते. त्यासाठी पालकांनी मुलांसमोर सतत भांडू नये. मुलांसमोर सतत फोनवर राहणं, सोशल मीडियावर गुंतून राहणं किंवा कामाचा ताण त्यांच्यावर उतरवणं हेही टाळलं पाहिजे. मुलांना प्रेम, लक्ष आणि प्रोत्साहन हवं असतं. पालकांनी त्यांचं ऐकून घ्यायला हवं, छोट्या छोट्या यशावर त्यांना शाबासकी द्यायला हवी.

टॅग्स :पालकत्व