Join us

मुलांना कायम छळतात पालकांच्या 'या' ४ गोष्टी, उद्धवस्त होतं आयुष्य- दुर्लक्ष करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2025 09:30 IST

parenting mistakes: common parenting mistakes: emotional damage by parents: things parents should not do: तुम्ही तुमच्या मुलांमध्ये भेदभाव करताय का? वेळीच थांबायला हवं..

आईवडील हे प्रत्येक मुलासाठी पहिला आधार, पहिलं जग असतं. (parenting mistakes) त्यांच्या प्रेमात, काळजीत आणि शिकवणीत मुलांचे संपूर्ण आयुष्य घडवलं जातं.(common parenting mistakes) पण कधी कधी हीच माया आणि ओलावा नकळत त्यांच दडपण बनतं.(emotional damage by parents) आपल्यापैकी अनेकांना दोन अपत्य असतील.(things parents should not do) बऱ्याचदा पालक त्यांच्या मोठ्या मुलांना नकळतपणे अशा गोष्टी बोलतात ज्या त्यांच्या नाजूक मनावर खोल परिणाम करतात. जरी ते काहीही बोलू शकत नसले किंवा त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करु शकत नसले तरी त्यांना खूप दुखावले जाते.(toxic parenting habits) पालक आपल्या मोठ्या आणि लहान मुलांमध्ये बरेचदा भेदभाव करतात.(parent-child relationship tips) ज्यामुळे त्यांच्या मनात राग निर्माण होतो. त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करु शकत नसले तरी त्यांना असं वाटतं की, पालकांनी त्यांच्यावर दुप्पट प्रेम करावं.(psychological effects of bad parenting) बरेचदा पालकांच्या अशा वागण्यामुळे मुलं आपल्या भावंडांशी दुजाभाव करतात. पालक आता आपल्यावर तितकेसे प्रेम करत नाहीत किंवा त्यांचा धाकटा भाऊ किंवा बहीण आल्यापासून त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. असं त्यांना वारंवार वाटू लागतं. 

मुलं हट्टी, उद्धट वागतात, ओव्हरकॉन्फिडन्स वाढलाय? मुलांना शिस्त शिकवण्यासाठी ५ टिप्स, लागेल योग्य वळण

1. सगळ्यात आधी पालकांनी मुलांना असं कधीही म्हणून नये की तू सगळ्यात मोठा आहे, त्यासारखं वाग जरा. त्याऐवजी मुलांना काही गोष्टी प्रेमाने समजावून सांगा. त्यांच्या मनात याविषयी काय सुरु आहे ते जाणून घ्या. त्यांना काय वाटतं हे देखील विचारा. 

2. अनेकदा मुलं रडतात, अशावेळी पालक त्यांना तु मोठा झालास आता, रडू नका. असं ठामपणे बजावून सांगतात. पण अशावेळी पालकांनी त्यांच्या रडण्यामागचे कारण जाणून घ्या. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना मारण्याऐवजी त्यांच्याशी गोड बोला. 

3. पालक नेहमी मुलांना म्हणतात की, मला तुझ्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत.  मुलांना कायम प्रोत्साहन द्या. तू चांगला प्रयत्न कर असं त्यांना सांगा. प्रत्येक मूल हे वेगळे असते. त्यांची शिकण्याची पद्धतही वेगळी असते. त्यासाठी पालकांनी काही गोष्टी समजून घ्यायला हव्या. 

4. पालकांनी कधीही मुलांमध्ये भेदभाव करु नये. त्यांची मदत घेतल्यानंतर त्यांना थॅक्यू म्हणा.  ते अजूनही लहान आहेत. पालकांकडून मुलांना बरेच अपेक्षा असतात. त्यांना आपल्या दोन्ही मुलांना कायम समान वागणूक द्यायला हवी. आपल्या वागण्या आणि बोलण्यात तो फरक नसायला हवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Parenting mistakes that hurt children: Avoid these four common habits.

Web Summary : Parents' actions can unintentionally harm children. Avoid telling older children to 'act their age' or dismissing their feelings. Encourage them, avoid comparisons, and treat all children equally to foster healthy development.
टॅग्स :पालकत्व