Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यासाशी रोज व्हायचं भांडण, ३ वर्षे डोक्याला ताप!’- काजोल सांगते घरातलं वादळ कसं शांत झालं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 16:43 IST

काजोल म्हणते जेव्हा मी एक पालक म्हणून आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्टी शिकले तेव्हा माझे आणि माझ्या लेकीचे वाद संपले...

ठळक मुद्देतिला फक्त तिच्या मनातलं सगळं मला सांगायचं होतं. मग ते भलेही चूक असे किंवा बरोबर असो..

मुलं वाढत्या वयात आली की त्यांचे आणि पालकांचे खटके उडणं ही आता जवळपास सगळ्याच घरांमध्ये दिसून येणारी गोष्ट.. पालकांना मुलांचं वागणं पटत नाही आणि आई- बाबांनी काही सांगितलेलं मुलं ऐकत नाहीत. यातूनच मग सतत वाद, कुरबुरी सुरू होतात. काजोलच्या घरीही असंच काहीसं झालं जेव्हा तिची मुलगी १२ वर्षांची झाली. मायलेकीमध्ये सतत भांडणं, वाद होत होते. दोघीही एकमेकींवर चिडायच्या, भांडायच्या, अबोला धरायच्या. हे जवळपास ३ वर्षे चाललं आणि त्यानंतर मात्र सगळं शांत, सुरळीत झालं. त्यासाठी मात्र नेमकं काय व्हावं लागलं याविषयी काजोलनेच सांगितलेले काही किस्से वाढत्या वयातली मुलं असणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी उपयुक्त ठरू शकतात...

 

लीली सिंग यांच्या पॉडकास्टमध्ये काजोलला तिच्या आणि तिच्या मुलीच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काजोल म्हणाली की न्यासा जेव्हा १२ वर्षांची झाली तेव्हा ती खूप बदलली. कधी कधी तिचं वागणं अजिबात पटण्यासारखंच नसायचं. मग ते पाहून मी पण खूप विचित्र वागायचे.

Summer Care: भरपूर पाणी पिता; पण तरीही डिहायड्रेशन होतंय, शरीरातली उष्णता वाढतेय सांगणारी ४ लक्षणं

एक दिवस विचार केला ती वेगळ्या वयात आहे. तिच्या शरीरातले अनेक हार्मोन्स बदलत आहेत. अशावेळी मलाच पालक म्हणून माझा दृष्टीकोन बदलावा लागणार. कारण तिला एखादी गोष्ट कशी करायची हे सांगण्यासाठी आई नको होती. तर तिला फक्त तिच्या शेजारी बसून तिचं शांतपणे ऐकून घेणारी आई हवी होती. तिला काय करायचं हे माहिती होतं. तिला सूचना नको होत्या. तिला फक्त तिच्या मनातलं सगळं मला सांगायचं होतं. मग ते भलेही चूक असे किंवा बरोबर असो..

 

जेव्हा मी एक पालक म्हणून ही गोष्ट शिकून घेतली तेव्हा कुठे आमच्या नात्याला स्थिरता आली. आमच्या दोघींमधले वाद कमी व्हायला लागले. आम्ही एकमेकींशी शांतपणे बोलू लागलो.

कंगना रानौतने नेसलेल्या पांढऱ्या साडीनेही झाला मोठा वाद, साडीची किंमत वाचूनच डोळे पांढरे व्हायचे..

आमच्या गप्पा व्हायला लागल्या, नंतर त्या रंगू लागल्या आणि मग आमच्यामधलं ट्युनिंग हळूहळू चांगलं होत गेलं.. बरं झालं वयात आलेल्या मुलीशी कसं वागायला हवं, स्वत:मध्ये काय बदल करून घ्यायला हवा हे मला वेळीच कळालं.. आणि म्हणूनच आमचं नातं आज एका चांगल्या वळणावर आलं.. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol reveals how she resolved fights with daughter Nysa.

Web Summary : Kajol shares how constant arguments with her teenage daughter Nysa for three years led her to change her parenting approach. She realized Nysa needed a listening ear, not instructions, which improved their relationship and communication.
टॅग्स :पालकत्वकाजोल