Join us

ती तर मास्टर आहे! लेकीकडे बोट दाखवत शंभरावा विजय साजरा करणाऱ्या दमलेल्या बाबाची आनंदी गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 14:34 IST

Novak djokovic : Novak Djokovic’s daughter steals spotlight with adorable dance after win : Novak Djokovic's daughter Tara steals the show with her dance moves as she displays adorable family tradition at Wimbledon : अत्यंत अटीतटीच्या सामन्यांनंतरही लेकरांची काळजी घेत आनंद साजरा करणारा चॅम्पिअन बाबा...

नोवाक जोकोविच (novak djokovic) २५ व्या ग्रॅण्डस्लॅमसाठी सध्या विंम्बलडन खेळतो आहे. यानंतर कदाचित तो निवृत्तही होईल, कदाचित नाही. पण जोको आणि त्याच्या लेकरांचा संवाद ही टेनिस कोर्टवरची गोष्ट मात्र जगभरातल्या चाहत्यांना सुखावणारीच असते. गेल्यावेळी अटीतटीचा सामना मध्यरात्री जिंकल्यावर मध्येच मुलाखत थांबवून लांब उभ्या मुलांना उद्देशून तो म्हणाला होता, वाजले किती? तुम्ही अजून झोपला नाहीत? हा चॅम्पिअन असलेला बाप वाट्टेल त्या स्ट्रेसमध्ये (Novak Djokovic's daughter Tara steals the show with her dance moves as she displays adorable family tradition at Wimbledon) आपल्या मुलांसाठी वेळ काढतो. आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे त्याच्या लेकीचा विम्बलडन कोर्टवरचा अतिशय इनोसंट डान्स. त्यानं उजळून गेलेलं आहे ते नातंही आणि जिंकण्याहरण्यापलिकडचं जगणंही. (novak djokovic kids)

नोवाक जोकोविच आणि त्याची लेक तारा. मुलगा स्टिफन आणि बायको जेलेना यांचं एक चौकोनी कुटुंब आहे. त्या कुटूंबाचं आपलं एक खास जग आहे. त्या जगाला शिस्त आहे आणि कौटूंबिक प्रेमाची ऊबही. म्हणून तर अटीतटीचा सामना जिंकल्यावर जोकोविचला आठवतं की सकाळी शाळा आहे आणि मुलं अजून झोपलेली नाही. परवाही आपला शंभरावा विजय साजरा करत असताना त्याला समोर दिसत होती आपली लेक. ती ही बाबाकडे अत्यंत प्रेमानं पाहत साजरा करत होती आनंद.(Novak Djokovic’s daughter steals spotlight with adorable dance after win)

लेकीचं वय फक्त सात वर्षे. तारा नेहमी आपल्या वडिलांचे सामने पहायला येते. शंभरावा सामना जिंकल्यावरही जोकोविचला त्याच्या फेमस ‘पंप इट अप’ डान्सविषयी विचारण्यात आलं तर तो हसला म्हणाला ‘माझ्यापेक्षा ताराला विचारा, ती जास्त छान करते.  ते गाणं मला आणि मुलांना फार आवडतं. आम्ही घरी ते गाणं लावतो नी नाचतो सगळे.!’एवढं बोलून त्यानं लेकीला विचारले की दाखवते का यांना आपला डान्स?तिनंही आनंदाने तो डान्स करुन दाखवला.  

कुणाही बाबाला होतो तसा कौतुकाचा आनंद जोकोला झालाच आणि तो म्हणाला, ‘शी इज द मास्टर!’पंप इट अप हे गाजलेलं गाणं आहे. त्या गाण्यात प्रेरणा तर आहेच, पुढं चालत राहण्याची ऊर्जाही!लहानग्या मुलांसोबत आनंदानं बाबानं नाचावं तसं हे गाणं. हारजीत-स्पर्धा-ग्रॅण्डस्लॅम यासाऱ्याच्या पलिकडे जाणारं!तारा आणि तिच्या चॅम्पिअन बाबाच्या या पंप इट अप नृत्याची म्हणूनच जगभर चर्चा आहे.

टॅग्स :पालकत्वविम्बल्डननोव्हाक जोकोव्हिचसोशल व्हायरल